सिंदेवाही- मागासवगींय़ हायस्कुल वासेरा येथे बालक दिन साजरा

वासेरा - : मागासवर्गीय हायस्कूल येथे पंडीत जवाहरलाल नेहरु यांची जयंती बालक दिवस म्हणून साजरा
पंडीत जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालकदिना निमित्याने मागासवर्गीय हायस्कूल,वासेरा येथे  आयोजन करण्यात आले. वर्ग ८,९,१० चे विद्यार्थी सहभाग झाले.त्यानंतर ठिक ३:०० वाजता कार्यक्रम घेण्यात आला.अध्यक्षस्थानी आर.पी.चहांदे मु.अ.   अतिथी म्हणून एन.एम.तोंडफोडे, कैलास मेश्राम सर ,एम.एस.मेश्राम उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन कुमार भारत आरणवार तथा प्रास्ताविक कुमारी अंकीता ठाकरे हिने केले.तर कु.आचल धात्रक, सिमा कोवले, प्रियंका लोखंडे,काजल मेश्राम, समिक्षा मेश्राम   विद्यार्थीनीनी पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या जिवनाविषयी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार कुमारी पायल बोरकर
हीने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!