वाघा ने सविता वर झडप घातली, आई -वडील धावल्याने सविता चा प्राण वाचला. चिमूर क्रांती हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू
नेरी(चिमूर) (शुभम बारसागडे)
चिमूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. याआधी वाघाच्या हल्ल्यात अनेक पाळीव प्राणी तथा नागरिकांचे जीव गेले आहे. वाघाच्या दहशती ने, शेतकरी ,शेतमजूर हे शेती हंगाम भीती च्या वातावरणात करीत आहेत. अश्यातच मालेवाडा येथील शिक्षण घेत असलेली कु. सविता हि कापूस वेचण्यासाठी स्वतःच्या शेतावर गेली असता, कापूस वेचत असताना,अचानक दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने तिच्यावर झडप घेतली. परंतु आई वडिलांच्या ओरडण्याने वाघ उडी घेऊन बाहेर निघून गेला. त्यामुळे सविता जीवित हानी होण्यापासून बचावली.
कु. सविता रमेश भोयर हि मालेवाडा येथील असून, राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या वर्ग १२ वि त शिक्षण घेत आहे. तिची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने, ती मोल- मजुरीची कामे करते. ती मालेवाडा शेत शिवारात स्वतःच्या शेतात कापूस वेचण्यासाठी आई वडिलां सोबत गेली होती. सायंकाळी ५ वा च्या दरम्यान कापूस वेचून झाल्यावर गठठे बांधून पाठीवर घेऊन परत जायच्या वेळेस तिच्यावर दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने झडप घेतली. तेव्हा तिच्या आई वडिलांनी मोठमोठ्याने आरडाओरड केली. त्यांच्या ओरडण्यामुळे वाघ उडी घेऊन निघून गेला. या घटनेमुळे सविता भयभीत झाली आहे. वाघाने सविताच्या उजव्या मांडीला व उजव्या हाताला कपडे फाडून ईजा केल्यामुळे ती जखमी झाली आहे. नंतर रात्री तिला प्राथमिक आरोग्य केंद्र जांभुळघाट येथे उपचारासाठी नेले व उपचार करण्यात आला. त्यानंतर आज सविताला पुढील उपचारासाठी डॉ दिलीप शिवरकर यांच्या चिमूर क्रांती हॉस्पिटल मध्ये उपचार करण्याकरिता भरती करण्यात आले.
सविता हि जखमी झाली असली तरी परिस्थिती धोक्याबाहेर आहे वाघाची दहशत कायम असल्याने शेतकरी ,शेतमजूर वर्गात दहशत कायम आहे. तेव्हा या वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी भाजप चे तालुका महामंत्री विनोद अढाल। शरद गिरडे यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!