प्रभागातील स्वच्छतेसाठी नगरसेवकांनी ठोकला नगर परिषदला ताला - उमेश हिंगे व गोपाल झाडे यांच्या प्रभागातील अस्वच्छता - नगरसेवक विनोद ढाकुन करच्या पुढाकाराने आंदोलन मागे

नेरी(चिमूर) प्रतिनिधी: (शुभम बारसागडे)
           चिमूर नगर परिषद मधील प्रभाग  ९ व २ या प्रभागातील कचरा ,नाल्या ,साफ करण्यासाठी वारंवार मागील एक महिन्यापासुन पत्रव्यव्हार करून ही प्रशासन डोळेझाक करीत होते त्यामुळे  शिवसेना चे नगरसेवक उमेश  हिंगे व कांग्रेस चे नगरसेवक गोपाल झाडे यांनी आक्रमक पवित्रा घेत नगर परीषदेला ताला ठोकला मात्र नगरसेवक विनोद ढाकुनकर याच्या मध्यस्थीने आक्रमक नगरसेवकांनी आंदोलन मागे घेतले.
        सतरा प्रभाग असलेल्या चिमुर नगर परिषद क्षेत्रातील अनेक प्रभागात नाल्या सांडपाणी ब स्वच्छतेच्या बाबीकडे प्रशासनाने दुर्लक्ष करीत आहे प्रभाग क्रमांक ९ व २ मध्ये डुकरांचे वावर असून घानीचे साम्राज्य पसरले आहे. गंदगीमुळे प्रभागात रोगराई पसरली आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ९ चे नगरसेवक उमेश हिंगे यांनी प्रशासनाला पत्रव्यवहार एक महीन्यापासुन केला होता मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. असाच प्रकार प्रभाग क्रमांक २ मध्येही झाली त्यामूळे दोन्ही नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत चक्क नगर परिषदच्या गेटला ताला लावला.
        
             चिमूर नगर परिषद मधील प्रभाग ९  मधील  कवडसी,केसलापूर, ,नेताजी वार्ड येथील नाली च्या बाजूने कचरा असताना  अस्वच्छता होती आरोग्यास हानिकारक असल्याने जनतेच्या हितासाठी नगरसेवक उमेश हिंगे हे सातत्याने नप च्या संपर्कात राहून दोन वेळा लेखी  पत्र देऊन सुद्धा दुर्लक्ष करीत होते
     नगरसेवक गोपाल झाडे यांचे प्रभाग २ मधील नवीन वस्ती ते पिंपलनेरी रस्ता दोन्ही बाजूला  घाण , कचरा असल्याने जनता त्रस्त झाली होती याबाबत तोंडी सूचना देऊन सुद्धा ऐकत नव्हते
नंतर नगरसेवक उमेश हिंगे व गोपाल झाडे यांनी आक्रमक रूप घेऊन नप ला ताला ठोकण्याचा इशारा दिला होता.नंतर ताला ठोकण्याची माहिती चाहूल लागताच नगरसेवक विनोद ढाकुंनकर धावून आलेआणि त्या दोन नगरसेवकांची समजूत काढून ताला ठोको आदोलन मागे घेत मुख्याधिकारी शाह यांचे शि चर्चा करून अखेर जेसीबी पाठविण्याचे आश्वासन दिले आणि स्वच्छतेसाठी जेसीबी धावून आली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!