चिमुरातील भूखंड घोटाल्यातील व्यवसायिकानंतर तलाठी किरीमकर, तत्कालीन मंडळ अधिकारी नेऊलकर यांना अटक: बनावट कागदपत्रे करुन भूखंडाचे विक्री प्रकरणात सहभाग प्रकरणी चिमूर पोलिसाची कार्यवाही.

शुभम बारसागडे:
नेरी(चिमूर) प्रतिनिधी:
चिमूर शहरातील वडाळा पैकू येथील  बनावट कागदपत्रे बनवून भूखंड विक्री प्रकरणात फसवणूक केल्याच्या कारणावरून मूळ चिमूर येथील रहिवासी भुखंड व्यवसायिक अविनाश खाडे याला जुलै महिन्यात अटक केल्यानंतर आज दिनांक १नोव्हेंबर ला वडाळा पैंकु तलाठी सांजाचे तलाठी घनश्याम किरीमकर व तत्कालीन चिमूर चे मंडळ अधिकारी अशोक  नेऊलकर  (सेवानिवृत्त ) या दोन शासकीय कर्मचारी यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे महसूल विभागात खळबळ माजली आहे. त्याना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १५हजार रुपयांचे जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले ,या घटनेने भूखंड व्यवसायिकात मोठी खळबळ उडाली आहे.
चिमूर क्राती जिल्हा होणार ,चिमूर नगरपरिषद होणार अश्या आशेवर अनेक  भूखंड व्यवसायिकाचे जाहिरात बाजी करून अनेक ग्राहकांना भूखंड विक्रीचा व्यवसाय उभारून काहींनी आर्थिक लोभापाही व झटपट श्रीमंती थाट मिळविण्याच्या नांदत भूखंडाचे बनावट कागदपत्रे तयार करून विक्री करतात. असाच एक प्रकार चिमूर शहरातील तलाठी सांजा वडाळा पैकू १३ ब नं ४५९ येथील भूखंड व्यवसायिक अविनाश कल्याणजी खाडे रा पिपळनेरी यांनी चिमुरातील हेमंत चरपे नावाचे व्यक्तीस विक्री केले होते. त्यात प्रात्यक्षत भूखंडच नसून ते खुले मैदान होते. त्यामुळे खरेदीदार हेमंत चरपे यांनी नोंदणी निबंधक ,महसूल विभाग ,पोलीस विभागात तक्रार करून करून, कार्यवाही ची मागणी केली होती. त्यामुळे चिमूर पोलीस या प्रकरणी चौकशी करीत होते. व नुकताच महसूल विभागाच्या अहवालात  बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याची माहिती प्राप्त झाल्याने, चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश लबडे यांनी मोठ्या शिताफीने भुखंड व्यवसायिक  अविनाश खाडे यांस नागपुरातील हुडकेश्वर येथून जुलै महिन्यात  अटक केली होती. त्यानंतर बनावट कागदपत्रे व फेरफार प्रकरणी ज्या शासकीय कार्यालयातील काम झाले त्यात वडाळा पैंकु तलाठी साजाचे तलाठी घनश्याम किरीमकर व चिमूर मंडळ कार्यालयाचे तत्कालीन मंडळ अधिकारी अशोक नेऊलकर (सेवानिवृत्त)  यांना आज चिमूर पोलिसांनी अटक केली आहे. या अनागोंदी कारभारामुळे महसूल प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे .
       या प्रकरणी चिमूर पोलीस स्टेशनमध्ये भादवी कलम ४२०,४६७,४६८ फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे या कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता यात प्रमुख आरोपी अविनाश खाडेला यापूर्वी जुलै मधे अटक करून न्यायल्यात हजर केले असता, पोलिसांनी ७दिवसाची मागितलेली पोलीस कोठडी न्यायालयाने मंजूर करीत, २२जुलै पर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. तर आता दोन शासकीय कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आणखी या प्रकरणी काय उघडकीस येते या कडे सर्वांचे लक्ष लागले असून, या घटनेने मात्र भूखंड व्यवसायिकाचे धाबे दणाणले आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!