सिंदेवाही शहरात वाहतुक पाेलीसाचे दुर्लक्ष. - स्टंटबाजी मुळे पादचार्यांचा जीव टांगणीला. - शहरात दुर्लक्ष का? नागरिकाचा सवाल!
सिंदेवाही (प्रशांत गेडाम) :-सिंदेवाही शहरात अलीकडे युवा अवस्थेतील तरुणांमध्ये भरधाव वाहन चालवणे व स्टंटबाजीची जीवघेणे(बाइक स्टंट) करणे अशी क्रेझ निर्मान झाली आहे.राञी आणि दिवसादेखील हा प्रकार जाेरात चालला असल्याने रस्तावरून चालणार्या पादचार्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
सिंदेवाही पाेलीसांचे माञ याकडे दुर्लक्ष हाेत आहे.या क्रेझपाेटी हे तरुण राञी उशीरापर्यत ईकडे-तीकडे दुचाकी घेउन हुंदडत असतात.सिंदेवाही शहरात अनेक मार्गावर स्टंटबाज युवकांचा वावर असते.वर्दळीचे ठीकाण असलेले बसस्थानक चौकात व खास करुऩ नवीन बसस्टाप मध्ये तसेच शहरात आतमध्ये गावातील चौकात व गावात रस्त्यावर आपले खासगी वाहणे उभे करुण ठेवतात. खासगी व्यापाराचां दाेन टँक्टरी जाणारे - येणार्या मार्गाने ठेवल्याआहेत. त्यामुळे त्यां रस्ता वरील सामोरु येणारे वाहण दिसत नाही.व त्यामुळे तीथे अपघात होत आहेत. तसेच अनेक युवक नंबर नसलेली दुचाकी वाहणे तसेच ,नंबर चा जागी त्याची नावे अशी वाहणे भरधाव वेगाने चालवतात . त्यामुळे अनेकदा इतर वाहन धांरकाना ञास सहन करुन भिती बाळगावी लागत असते.सिंदेवाही शहर वाहतुक पोलिसांकडुन थोडी ,बहूत कारवाई होत असली तरी भिती उरली नसल्याने स्टंटबाजीचे प्रकार वाढले आहे.ऐख्याद्याचां जिव गेल्यानंतर विभागाला जाग येइल का ?
असा सवाल सिंदेवाही शहरातील नागरिकांनी केला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!