खुटाळा येथे वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची 49 वी पुण्यतिथी: तथा चातुर्मास समाप्ती महोत्सव
नेरी प्रतिनिधी:
संपूर्ण जगाला मानवतेची शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ४९ वी पुण्यतिथी व चातुर्मास समाप्ती महोत्सव ४ ऑक्टोबर ला गुरुदेव सेवा मंडळ खुटाळा येथे साजरा केल्या गेला.
3 दिवसांपासून सुरू असणाऱ्या या महोत्सवात विविध धार्मिक, सांस्कृतिक, समाज प्रबोधन, जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 3 ऑक्टोबर ला सकाळी १२ वाजता तिर्थस्थापणा करण्यात आली. तसेच ४ ऑक्टोबर ला पहाटे पाच वाजता सामुदायिक ध्यान, व स्वछता अभियान राबविण्यात आले. यावेळी, गावकऱ्यांनी, विशेष करून महिलांनी आपआपल्या घरासमोरील रस्ते स्वच्छ करून, तिथे रांगोळ्या काढल्या होत्या. नंतर साडे सात वाजता ढोल, ताश्याच्या गजरात भजन आणि देवाचे गाणे म्हणत नाचत गाजत राष्ट्रसंतांच्या पालखीसमवेत गावातून रामधून(फेरी) काढल्या गेली. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गावातील चौकात वेगवेगळ्या कलाकृती उभारल्या होत्या यामध्ये, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कुटी, शिवाजी राजे, माता जिजाऊ, महात्म्या गांधी, गाडगेबाबा, इत्यादी यांची वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधले होते. तसेच गावातील चौकाचौकात फुगडी खेळण्याचे आयोजन करण्यात आले यामध्ये गावातील पुरुषांनीही आपला सहभाग दर्शवला होता यात काही बक्षीसेही ठेवण्यात आली होती. १२ वाजता गुरुदेव सेवा मंडळ खुटाळा तर्फे भजन करण्यात आले. 2 ते ४.३० पर्यंत ह.भ.प. कविताताई येनूलकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर गावातील गुरुदेव कार्यकारी मंडळाचे कार्यकर्ते तसेच गुराखी व इतर नागरिकांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. सरतेशेवटी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मनोगताद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व काला आटोपून महाप्रसादाला सुरुवात झाली.
या कार्यक्रमाच्या 1 महिन्याआधीच गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते गावातून दररोज पहाटेला काकड आरती काढतात हे विशेष,
या संपूर्ण कार्यक्रमाला यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी गावातील तरुण मंडळी, बालगोपाल, महिलावर्ग, आबाल वृद्ध यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!