खुटाळा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न, 130 रुग्णांनी केली आरोग्याची तपासणी.

नेरी प्रतिनिधी:
                   चिमूर तालुक्यातील नेरी येथून जवळच असलेल्या खुटाळा येथे प्रफुल गुलाबराव शेंडे  रा. खुटाळा यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त रविवारला मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी, खुटाळयातील 130 रुग्णांनी आपल्या आरोग्याची तसेच BP चेकअप तपासणी करून घेतली. हा शिबीर १२ ते ३ वाजेपर्यंत राबविण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच किशोर जांभुळे हे होते. विशेष अतिथी म्हणून श्री भीमराव कामडी, गुणवंता गायकवाड उपसरपंच, प्रमोद श्रीरामे तंमुस अध्यक्ष,सहकारी म्हणून लाभलेले पराग लोथे, उमेश वरघणे, निखिल इष्टाम, अनुराग गावंडे. तसेच रुग्णाची आरोग्य तपासणी करण्यासाठी Dr अमोल बुटले, Dr सचिन गावंडे, Dr शिवप्रसाद यादव, Dr प्रियंका तलांडे, Dr रेश्मा सोरदे यांची टीम होती. यावेळी रुग्णांना आरोग्यासाठी डॉक्टर चा सल्ला व बिमारी विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
प्रफुल शेंडे यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त राबविलेल्या या उपक्रमामुळे खुटाळा येथील गावकर्यांना त्यांच्या आरोग्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांचे गावात सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!