पास्को अंतर्गत शाळेच्या शिपायावर गुन्हा दाखल जनता विद्यालय मुरपार येथील घटना
नेरी(चिमूर) प्रतिनिधी:
चिमूर तालुक्यातील मुरपार येथील जनता विद्यालयात इयता ९ व्या वर्गात शिकणाऱ्या मिनझरी येथील रहीवासी असलेल्या अल्पवयस्क मुलीला परीक्षा सुरू असताना पेपरमध्ये पास करन्याचे आमीश दाखवुन शरीर सुखाची मागनी करनारा जनता विद्यालयातील शिपाई देवानंद गोवर्धन श्रीरामे वय ४६ मुलगी व वडीलांनी दिलेल्या तोंडी तक्रारी वरून पोलीसांनी पास्को व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
मिनझरी येथे माध्यमिक शिक्षणाची सोय नसल्याने गावापासुन एक किमी अंतरावर असलेल्या जनता विद्यालय मुरपार येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ये -जा करावे लागते. दरम्यान ९ व्या वर्गाचे प्रथम सत्र चे पेपर सुरू असताना १० ऑक्टोबर ला पिडीता बिजगनीताचा पेपर देन्यासाठी शाळेत गेली असता पेपर सुटल्यावर शाळेतील कार्यरत चपराशी देवानंद गोवर्धन श्रीरामे पिडीत विद्यार्थीनी जवळ येवुन भूमितीची प्रश्न पत्रिका देतो तु मुरपार जवळ एकटीच थांब मी थांबले असता आरोपीने मि तुला प्रश्न पत्रिका दिली तु मला खुश केलीस नाही. प्रश्नपत्रीकादित्याची बाब आई वडिलांना सांगीतली. दुसऱ्या दिवशी शाळेत गेली असता आरोपी माझे जवळ आला तुला हिंदीची प्रश्न पत्रिका पाहीजे का तेव्हा मी त्याला नाही म्हटले त्यानंतर गावातील दुकानात गेली बाकीच्या कशा जंगलात येतात तशीच तुपन ये असे म्हनाला भिती पोटी ही माहीती घरच्यांना सांगितली नाही. मात्र आरोपीचा अतिरेक वाढल्याने आईवडीलांना आपबीती ३ नोव्हेंबरला सांगीतली.
याविषयी पालकांनी मुख्याध्यापकाकडे तोंडी तक्रार केली होती मात्र मुख्याध्यापकाने या प्रकरनाला गंभीरतेने घेतले नाही. पिडीता व वडीलांनी ४ नोहेंबरला चिमूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली . तक्रारीवरून आरोपी देवानंद गोवर्धन श्रीरामे विरोधात भांदवी ३५४ व पास्को अंतर्गत शनीवार ला रात्री उशीरा पर्यत पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. वृत्त लिहेपर्यत आरोपीला अटक झाली नाही.
.पुढील तपास उप विभागीय पोलिस अधिकारी प्रशांत परदेशी यांचा मगर्दर्शनात ठानेदार दिनेश लबडे करीत आहे .


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!