शेतकऱ्यांच्या हितासाठी धावून गेले आमदार किर्तीकुमार भांगडीया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिवाळी अधिवेशनात काढणार तोडगा
शंकरपुर प्रतिनिधी (शुभम बारसागडे)
चिमूर विधान सभा क्षेत्रात आमदार किर्तीकुमार भांगडीया हे दिलेला शब्द पूर्ण करीत विकासाचे मोठं मोठे काम करीत असून यंदा पाऊस अनियमित आला नसल्याने धान ,सोयाबीन ,हळद ,कापूस पिके चे उत्पन्न कमी प्रमाणात होण्याची दाट शक्यता असल्याने चिमूर विधान सभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना शासकीय आर्थिक मदत देण्यात यावी यासाठी आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचे नेतृत्वात भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ श्यामजी हट वादे यांनी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांच्या विविध मागणी चे निवेदन दिले असता चौकशी चे आश्वासन दिले आहे
चिमूर विधान सभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडीया हे शेतकऱ्यांचे कैवारी असून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी व त्याच्या दुःखात सहभागी होऊन त्यांनी तात्काळ मुबई गाठून मुख्यमंत्री दालनात मुख्यमंत्री ची भेट घेतली चिमूर ,नागभीड तालुक्यात यंदा अनियमित पाऊस पडला अनेक शेतकऱ्यांची रोवणी झाली नाही ज्यांनी केली त्यांचे धान पीक रोग राई ने फस्त झाली तसेच सोयाबीन ,कापूस पीक चे उत्पन्न कमी प्रमाणात होत असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे कर्जबाजरी झाला असून शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून शासकीय आर्थिक मदत देण्यात यावी व मागील हळद उत्पादकांना शासकीय अनुदान मंजूर झाले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते १६ आगस्ट ला हळद उत्पादक शेतकऱ्यांना प्रमाण पत्र देण्यात आले होते परंतु चिमूर पंचायत समिती स्तरावरून संबंधित कृषी अधिकारी कडून टाळाटाळ करीत असून दिशाभूल केल्या जात आहे या प्रकाराची सुद्धा निवेदनात मागणी आहे शेतकऱ्यांच्या संवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार किर्तीकुमार भांगडीया नि सांगितल्यावर येत्या नागपूर च्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना शासकीय आर्थिक मदत देण्याचे मान्य करीत नक्कीच तोडगा काढणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे निवेदन आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचे नेतृत्वात देण्यात आले असून चौकशी चे आश्वासन दिले आहे यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ श्यामजी हट वादे , भाजयुमो तालुका महामंत्री योगेश नाकाडे सहित आदी उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!