चिमूर शहरावर स्वाईन फ्ल्युचे सावट - नागरीकात भितीचे वातावरण

चिमूर शहरावर स्वाईन फ्ल्युचे सावट
- नागरीकात भितीचे वातावरण
- स्थानिक प्रशासन निद्रावस्थेत
- रूग्ण घेतात खाजगी रुग्णालयात उपचार

नेरी(चिमूर)(शुभम बारसागडे)

       चिमूर तालुक्यात पावसाळ्यात पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने व वातावरनातील बदलामूळे शहरात सध्या विषाणूजन्य तापाच्या रुग्णात वाढ झाल्याचे चित्र रुग्णालयात वाढलेल्या गर्दीवरून निदर्शनात येत आहे.व्हायरल फिवर हा साधा ताप आहे की डेग्युं, मलेरीया या चिंतेत असतानाच आता चिमूर नगर परिषद मधील प्रभाग क्र. ५ मधील मानीक नगर येतील एका महिलेला स्वाईन फ्ल्यूचे लक्षण आढळल्याने शहरावर सध्या स्वाईन फ्ल्युचे सावट पसरले असल्याची चर्चा नागरीकात सुरू आहे. त्यामूळ नागरीकात भितीचे वातावरण पसरले आहे.
         चिमूर येथे मागील दोन वर्षाअगोदर नगर परिषद ची निर्मिती कान्यात आली . त्यामूळे शहरात विकास कामाचा सपाटा सुरू असला तरी नाली बांधकाम गाार व्यवस्था व स्वच्छता या बाबीकडे नगर प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामूळे प्रभागात कचऱ्याचे साम्राज्य वाढले असुन खाली प्लाटवर पावसाचे पाणी जमा झाले आहे. दुर्गंधीमुळे परीसरात डासाचे साम्राज्य वाढले आहे. वातावरनाच्या बदलामुळे शहरासह गाव -खेडयात तापाच्या रुग्णात वाढ झाली आहे.
          तालुक्यात आज पर्यत मलेरीया, डेग्यूं याच तापापर्यत रूग्णं आढळत होते. मात्र चिमुरातील प्रभाग क्रमांक बारा मधील एका महिलेचा मृत्यु स्वाईन फ्ल्यु ने झाल्याची चर्चा शहरात होती. तर नुकतेच मानीक नगरातील प्रभागा क्रमांक पाच मध्ये एक महीला रुग्णांला तापाची लागन झाल्याने येथील खाजगी डॉक्टरने नागपूर येथे रेफर केले. तिथे उपचार सुरू केला असता या रूग्णांमध्ये स्वाईन फ्ल्यु चे एच वन एन वा विषानु आढळल्याची रिपोर्ट त्या रूग्णालयातील डॉक्टरांनी दिली. त्यामूळे चिमुर शहरात स्वाईन फ्ल्यु चे आगमन झाल्याने नागरीकात भितीचे वातावरण पसरले आहे.
....................... ..........
- शहरात डुकरांचा मुक्तसंचार -
          स्वाईन फ्लूचे विषाणु गावटी डुकरामुळे तयार होतात मात्र चिमुर शहरात गावटी डुकरांचा मुक्त संचार सुरू आहे यावर नगर प्रशासनाने काना डोळा केला आहे. त्यामुळे शहरात डुंकरांचा संचार वाढला आहे.
.............................................
         चिमुर शहरातील मानीक नगर परीसरातील एका रुग्णाच्या रिपोर्ट मध्ये एच वन एनवन पाझी टीव आढळले आहे. मात्र हा भाग जांबुळ घाट प्राथमीक आरोग्य केद्रांत येते. स्वाईन फ्लयुचे इन्फेक्शन डुकरामुळे होते. डुकरांचा बंदोबस्त करन्याचे काम नगर परिषदचे आहे. उपजिल्हा रुग्णालयात अजुन असे रुग्ण आढळले नाही.
         जि.डब्ल्यु.भगत
वैधकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय चिमूर.
.............................................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!