अॅक्ट्रासीठी विषयी समाजातील गैरसमज दूर होन्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रभावी काम
अॅक्ट्रासीठी विषयी समाजातील गैरसमज दूर होन्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रभावी काम
- समतादूत प्रज्ञा राजुरवाडे
- सरपंच, उपसरपंच, व सदस्यांना अॅक्ट्रासिटी कायद्यावर मार्गदर्शन
नेरी(चिमूर)प्रतिनिधी:
आजही देशात जातीयभूमीकेतून अनुसुचीत जाती, जमातीवर अत्याचार होताना दिसतात. देशात सामाजीक समता प्रस्तापीत करन्यासाठी व संवीधानात असलेल्या कायद्याची प्रभावी अंमलबजावनी व्हावी या उद्देश पुर्तीसाठी जानीव जागृती होने महत्वाचे आहे. लोकांच्या मनात प्रेम, भावणा, आपुलकी असेल तरच मानुसकीचे नाते घट्ट होवुन मानवी अधीकाराचे उल्लघंन होनार नाही. अॅक्ट्रासीटी कायदया विषयी समाजातील गैरसमज दुर होवुन अनुसुचीत जाती, जमातीला संरक्षण देवून समता प्रस्तापीत करता येते. हेच राष्ट्रीय एकात्मतेचे प्रभावी काम होईल.
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग व पंचायत राज प्रशिक्षण केंद्र मुल च्या वतीने ग्रामपंचायत पदाधिकारी क्षमता बांधणी राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियाना अंतर्गत शंकरपूर केंद्रातील सरपंच, उपसरपंच, व सदस्यांना अॅक्ट्रासीटी कायदा या विषयी सविस्तर मार्गदर्शन करताना बार्टी पुनेच्या समतादूत प्रज्ञा राजुरवाडे बोलत होत्या.
अॅक्ट्रासीटी कायदा विषयी मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे चे महासंचालक राजेश ढाबरे , मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शंकरपूर येथे घेन्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच दिक्षा भगत, प्रमुख अतिथी पंचायत राज प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर चे प्राचार्य अविनाश गरपल्लीवार ,मार्गदर्शक समतादूत प्रज्ञा राजुरवाडे, यशदाचे प्रशिक्षक प्रा.विनायक पाकमोडे, प्रा.आर. डी. गुनारकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा.एम.जी. वरवटकर यांनी केले. या कार्यक्रमाला जांबुळघाट, शंकरपूर केंद्रातील ग्रा.प. पदाधीकारी, कर्मचारी उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!