कर्जमाफीचा भोंगळ कारभारत शेतकऱ्यांची दिवाळी गेली अंधारात - ऑनलाईन अर्ज करूनही अनेकांची नावे यादीतून गायब
नेरी(चिमूर) शुभमं बारसागडे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी *छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना* नावाने कर्जमाफी जाहीर केली. यात देशातील आजवरची सर्वात मोठी कर्जमाफी म्हणून मोठ्या घुमधडाक्याने प्रचार सुद्धा करण्यात आला. कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी शेतकर्याना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन शासनामार्फत करण्यात आले. शेतकऱ्यांनी आपल्या जिव्हाची लाही करून रात्रंदिवस जागून कर्जमाफीसाठी चे अर्ज भरले.
कर्जमाफीचे फॉर्म ऑनलाईन केल्यानंतर चावळी वाचन घेण्यात आले. मात्र ऑनलाईन फॉर्म भरूनही अनेकांची नावे कर्जमाफीच्या यादीतून नावे गहाळ झालेली आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांची ऑनलाईन अर्ज भरूनही नावे कर्जमाफीच्या यादीत नावे आलेली नाहीत यासाठी काय करण्यात आले. याची माहिती सुद्धा चावळी वाचन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा नसल्याने ज्यांची नावे यादीत नाहीत त्यांनी काय करावे याचे उत्तर कुठल्याही कर्मचारी यांना महिती नसल्याने शेतकरी हे चांगल्याच बुचकळ्यात पडलेले आहेत. त्यामुळे शेतकरी हे कर्जमाफीच्या लाभातून वंचित राहण्याची भीती आहे.
महाराष्ट्राचे महसूल मंत्री हे दिवळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले परंतु अजूनही नेरी परिसरात शेतकऱ्यांच्या खात्यात एकही रुपया जमा झालेला नाही. अश्यातच अनेकांची नावे ऑनलाईन यादीतून गहाळ झाल्याने मात्र शेतकऱ्यांवर संक्रांत येण्याची वेळ आलेली आहे.
त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरूनही त्यांची नावे यादीत आलेली नाहीत त्यानी काय करावे याचे उत्तर कोणत्याही अधिकाऱ्याकडे नसल्याने शेतकरी चांगलेच हतबल झालेले आहेत. आणि या कर्जमाफीच्या गोत्यात शेतकरी भरडला जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!