मूल पंचायत समिती उपसभापती चंदू मारगोनवार यांचे वर गुन्हा दाखल

ग्राम पंचायत निवडणूकीत विरोधात प्रचार केल्याचा आरोप करीत मारहाण करणाऱ्या मूल पंचायत समितीचे उपसभापती चंदू मारगोनवार यांचेवर मूल पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.  दिवाकर फाले यांचे तक्रारी वरून हा गुन्हा दाखल केला.
बेंबाळ ग्राम पंचायतची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. या निवडणुकीत भाजपचे पदाधिकारी, मूल पंचायत समितीचे उपसभापती चंदू मारगोनवार यांचे नेतृत्त्वाखाली मोठा विजय मिळवला. या विजयामुळे मूल शहरात मिरवणूक काढण्यात आली. या दरम्यान दिवाकर फाले दिसताच, मारगोनवार यांनी, तू काॅंग्रेसला मदत केलीस असा आरोप करीत बेदम मारहाण केली.
दिवाकर फाले यांनी या घटनेची मूल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. वैद्यकीय तपासणी नंतर पोलीसांनी चंदू मारगोनवार यांचे वर भादवीचे कलम २९४, ५०६, ३२३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय घडामोडी घडून सदर गुन्हा मागे घेवून तडजोड करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!