लक्ष्मी म्हणाली, 'अहो शहा...' - ज्ञानेश वाकुडकर
असं फार क्वचित होते, की एखादं चित्र किंवा कलाकृती पाहताक्षणी लगेच कविता सुचावी ! आज लोकमत मध्ये व्यंगचित्रकार राज ठाकरे यांचं अप्रतिम, अफलातून व्यंगचित्र पाहिलं.. आणि लगेच ही कविता झाली..!
तेव्हा..ती त्यांनाच सादर समर्पित..!
----
----
लक्ष्मी म्हणाली, 'अहो शहा...'
----
लक्ष्मी म्हणाली, 'अहो शहा ! थोडे उसणे जमते का पहा !
मला उधार मिळेना चहा ! वांधे जाहले नाश्त्याचे !!
सरस्वती भलतीच तिरसट बाई ! तुम्हाला अक्कल दिलीच नाही !
एवढ्या एका घोळापायी ! दिवाळे निघाले देशाचे !!
'शिव-वडापाव' खाता खाता ! रडत होती भारतमाता !
'मोदी कुठे सापडेल आता ?' ऐसे चिडून म्हणाली !!
मी मुद्दाम बोलले नाही ! गोभक्त असू दे किंवा कसाई !
जिकडे दिसतील तरण्या गाई ! तिकडेच दोघे असायचे !!
मला ठाऊक असते सारे ! कोणत्या दिशेने वाहती वारे !
सत्य कुठे लपते का रे ? तुम्हाला कुणी सांगावे ?
इंद्रही परवा वैतागून म्हणाले ! ''सोमरसा'चे वांधे झाले !
अप्सरांचे मेसेज आले ! 'आधीचे बिल क्लिअर करा !'
इंद्रासभा जाहली सुनी ! परफॉर्मन्स ला येईना कुणी !
पंक्चर जाहले नारदमुनी ! नवा फंडा सुचेना !!''
माझे हाल तर काहीच्या बाही ! दिवाळीला नवी साडी नाही !
तुमच्या आगाऊपणा पायी ! मी आत्महत्या करू का ?
तुम्ही नौटंकी केली तरी ! घबाड आले 'जय'च्या घरी !
कुंडली मारून अलगद वरी ! दुतोंडया साप बैसला !!'
नरूभाई, अमितभाई ! तुमचा तेवढा आवाका नाही !
देशात आहे लोकशाही ! तुमच्या चिंध्या गुंडाळा !!
----
ज्ञानेश वाकुडकर
नागपूर २१/१०/२०१७


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!