चंद्रपूरात १०० बेडचे कॅन्‍सर हॉस्‍पीटल

*वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने टाटा ट्रस्‍ट च्‍या सहकार्याने चंद्रपूरात उभे राहणार कॅन्‍सर हॉस्‍पीटल*

*मुल, पोंभुर्णा, बल्‍लारपुर, जिवती, गोंडपिपरी आणि नागभिड या तालुक्‍यांमध्‍ये राबविणार सधन शेतकरी प्रकल्‍प*

चंद्रपूर-गडचिरोली या जिल्‍हयांसाठी 100 बेडसचे कॅन्‍सर हॉस्‍पीटल चंद्रपूरात उभारण्‍यात येणार असुन वित्‍तमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने टाटा ट्रस्‍टच्‍या सहकार्याने हे कॅन्‍सर हॉस्‍पीटल पुढील वर्षी जनतेच्‍या सेवेत रुजु होणार आहे.

दि. 17 ऑक्‍टोंबर रोजी सहयांद्री अतिथीगृह मुंबई येथे झालेल्‍या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला. या बैठकीला वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍यासह चंद्रपूरचे जिल्‍हाधिकारी आशुतोष सलील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्‍ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. हसनाबादे, जिल्‍हा खनिकर्म अधिकारी डॉ. गजानन कांबळे, टाटा ट्रस्‍टच्‍या कॅन्‍सर विभागाचे ऋषभ कनोडीया, लक्ष्‍मण सेतुरामन, गणेश निलम, अनमोल रेले आदींची उपस्थिती होती. या बैठकीत चंद्रपूर येथे कॅन्‍सर हॉस्‍पीटल उभारण्‍याबाबत विस्‍तृत चर्चा झाली. चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्‍हयात कॅन्‍सर रुग्‍णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता. चंद्रपूर येथे कॅन्‍सर हॉस्‍पीटल उभारण्‍याची आवश्‍यकता वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिपादीत केली. टाटा ट्रस्‍ट, चंद्रपूर जिल्‍हा खनिज विकास प्रतिष्‍ठान यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने रुग्‍णालय उभारण्‍यात येणार आहे. रुग्‍णालयाची इमारत जिल्‍हा प्रशासना तर्फे तर यंत्र सामुग्री, मार्गदर्शन आणि तज्ञ याबाबतची जवाबदारी टाटा ट्रस्‍ट तर्फे घेतली जात आहे. अशा पध्‍दतीचे कॅन्‍सर हॉस्‍पीटल आसाम राज्‍यात टाटा ट्रस्‍ट उभारण्‍यात आले आहे.

या कॅन्‍सर हॉस्‍पीटलसाठी चंद्रपूर जिल्‍हा प्रशासन, टाटा ट्रस्‍ट व संचालक वैद्यकीय शिक्षण यांच्‍यात सामज्‍यस कराराचा नमुना तयार करण्‍याची कार्यवाही सुरु करण्‍यात आली आहे. इमारत बांधकाम आणि पायाभुत सुविधा राज्‍य सरकार तर्फे करण्‍यात येणार आहे. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एक वर्षीय पदवीका अभ्‍यासक्रमाच्‍या माध्‍यमातुन डॉक्‍टर्सना  कॅन्‍सर उपचारा संदर्भात प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे. टाटा मेमोरियल हॉस्‍पीटल मार्गदर्शक म्‍हणुन काम करणार आहे. वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूरात येत्‍या वर्षभरात हे कॅन्‍सर हॉस्‍पीटल उभे राहणार असुन त्‍या माध्‍यमातुन कॅन्‍सर रुग्‍णांना उपचाराची मोठी सोय उपलब्‍ध होणार आहे.

*सधन शेतकरी प्रकल्‍प*

चंद्रपूर जिल्‍हयातील मुल, पोंभुर्णा, बल्‍लारपुर, जिवती, गोंडपिपरी आणि नागभिड या तालुक्‍यांमध्‍ये टाटा ट्रस्‍ट सहकार्याने सधन शेतकरी प्रकल्‍प राबविण्‍यात येणार असुन टाटा ट्रस्‍टची चमु या तालुक्‍यांमध्‍ये सुक्ष्‍म नियोजनाचे तसेच माहीती संकलनाचे काम करणार आहे. शेतक-यांचे पीक उत्‍पन्‍न वाढावे, कुकुट पालन, शेळी पालन, डेअरी क्‍लस्‍टर, फलोत्‍पादन, सुक्ष्‍म सिंचन या सुविधा उपलब्‍ध करुन देत शेतक-यांचे उत्‍पन्‍न वाढवून त्‍यांचे जिवनमान उंचावण्‍याचा प्रयत्‍न या सधन शेतकरी प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन करण्‍यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!