फवारणी करतांना आदिवासी शेतक—याचा मृत्यू—सावली तालुक्यातील घटना
शेतातील फवारणीची विषबाधा होवून सावली तालुक्यातील चेक मानकापूर येथील आदिवासी शेतकरी मरण पावल्यांने खळबळ माजली आहे. साईनाथ मारोती मडावी (38) असे मृतक शेतक—यांचे नांव असून, तो धान शेतावर किटक नाशकांची फवारणी करीत होता.
सावली तालुका मुख्यालयापासून 7 कि.मी. अंतरावरील चेक मानकापूर येथील साईनाथ मडावी हा शेतकरी दुपारी 12 वाजताचे दरम्यान आपल्या शेतात फवारणी करण्यासाठी गेला होता. सायंकाळी 5 वाजताचे दरम्यान गावातील गुराखी तेथून जात असतांना साईनाथ खाली पडून असलेला आढळला व बाजूलाच किटकनाशकाची बाटल, फवारणी यंत्र पडलेले दिसल्यांने त्यांनी गावक—यांना बोलाविले. याबाबत पोलिसांनी पंचनामा करून, शवविच्छेदनासाठी सावली येथे आणले.
मृतकाचे मागे आई—वडिल, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. ऐन दिवाळीचे दिवशी कुटूंबावर दु:ख कोसळल्यांने अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
यवतमाळ जिल्हयात शेतातील फवारणी करतांना घातक किटकनाशकामुळे मोठया प्रमाणावर शेतकरी मरण पावल्यामुळे देशभर चर्चा झाली होती व कृषी विभागाने अशा किटकनाशकांवर बंदी आणण्याचे जाहीर केले होते, मात्र चंद्रपूर जिल्हयातील शेतकरी घातक किटकनाशकांच्या फवारणीमुळे मरत असल्यांची बाब पुढे आल्यांने कृषी विभागाच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.