सोनझरीच्या आदिवासीना पाणी द्या - श्रमिक एल्गारची मागणी
चंद्रपूर(प्रतिनिधी):
येथील सोनझरी वॉर्डात मागील काही दिवसांपासून महानगर पालिकेने पाणी पुरवठा बंद केल्याने त्यांना पाण्यासाठी भटकंती लागत आहे,
या वॉर्डात सोनझरी आदिवासी राहतात,येथे महानगरपालिकेने पाण्यासाठी नळाची व्यवस्था केली आहे मात्र त्यात अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने त्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याची भयाण परिस्थिती आहे , पाणी पुरवठा सुरू नसल्याने व इतर कुठलीही पाण्याची सोय नसल्याने दैनंदिन वापरासाठी एका डबक्यातून पिण्यासाठी पाणी आणत असल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही,
एकीकडे महानगर पालिका चंद्रपूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यावर भर देत असले तरी शहारातीलच एका वॉर्डात अशी भयाण परिस्थिती समोर येणे भयावह आहे ही समस्या दूर करण्यासाठी श्रमिक एल्गार प्रयत्न करीत आहे त्याकरिता आज संघटनेच्या महिला सचिव छाया सिडाम यांनी महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला निवेदन देऊन समस्या लवकरात लवकर सोडवावी अन्यथा संघटना तीव्र आंदोलन करणार असा इशाराही दिला


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!