नेरी परिसरात दुष्काळ जाहीर करा -परिसरातील शेतकऱ्यांची मागणी,
नेरी (प्रतिनिधी)-
चिमुर तालुक्यात नेरी व परिसरातील अंदाजे 20 गावातील धान शेतीचे फक्त दहा टक्के(नदीकाठावरील) रोवणे झाले व पावसाअभावी 90 टक्के धानशेती पडीत आहे.
या धान पिकविणाऱ्या शेतकर्यांच्या दुष्काळी परिस्थिती मुळे निर्माण झालेल्या अत्यंत बिकट परिस्थीतीचा सामना कसा करायचा यावर या परिसरातील लोकप्रतिनिधी मूग गिळुन गप्प असल्यासारखे भासत आहेत.
निवडणुका आल्या की हे लोक प्रतिनिधी मोठ मोठे आश्वासन देतात ,जनतेला भुरड पाळतात .आणी एकदा निवडुन गेले ,की आपण स्टेजवरुन काय बोललो याचा वीसर पडुन जातो ,बोललेल्या शब्दावर प्रामाणिकपणे काम झाले असते, तर आज अवर्षण होऊनही अशी ईतकी स्थिती बिकट झाली नसती.
2008 मध्ये चिमुर तालुक्यातील शेतकर्यांनी महाराष्ट्र शासनाच्या हिवाळी अधीवेशनावर मोर्चा काढला होता .मोर्चेकर्यांना आश्वासन देतांना तत्कालीन मंत्री महोदयांनी म्हटले की ,चिमुर तहसिलच्या पुर्वे कडील तेरा गावांना घोडाझरी धरणाचे पाणी ,पश्चिमेकडील भागाच्या सतरा गावास कोरा धरणाचे पाणी (लाल नाला प्रकल्प), दक्षिण भागास ह्यूमन प्रकल्पाचे पाणी, मध्य व उत्तर चिमुर तहसिल भागास गोसेखुर्दच्या मोखाबर्डी उपसासिंचनाचे पाणी दीले जावे असे महाराष्ट्र शासनाचे आदेश होते. त्यानुसार लोकप्रतिनिधींनी कार्य सूरु केले असते। तर आजची दुष्काळी स्थिती ईतकी बिकट निर्माण झाली नसती. चिमुर तालुक्यातील शेतकर्याबाबत सहानूभुती दर्शवुन पुर्व, पश्चिम,दक्षिण भागाची सिंचन व्यवस्था करण्यास फारसी अडचण राहीली नसती प्रश्न शिल्लक होता तो मध्य,व ऊत्तर चिमूर तहसिलचा ,कारण हे प्रकरण न्याय प्रवीष्ट आहे मोखाबर्डी उपसासिंचन प्रकल्पाचे काम अधापही तापी प्रेस ट्रेस कंपनीने पुर्ण केले नाही. या कंपनीने जुन 2017 पर्यंत सिंचन प्रकल्पाचे पूर्ण काम करण्याचे आश्वासन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाला दिले होते. त्यानुसार सदर कंपनीने काम केले नाही. याबाबत सुध्दा लोकप्रतिनिधी प्रयत्न करतांना दिसुन येत नाही. त्यामुळे स्वातंत्र्याच्या पासष्ट वर्षात चिमुरला शेती सिंचनाची समस्या भेडसावत आहे . या व सध्याच्या दुष्काळी परिस्थितीतीचा सामना कसा करायचा असा प्रश्न नेरी व परीसरातील शेतकऱ्यांपुढे आ वासून उभा आहे.
दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!