प्रवाश्यांच्या असाहयतेचा गैरफायदा

प्रवाश्यांच्या असाहयतेचा गैरफायदा,
  शुभम बारसागडे:
                         ऐन सनासुदीत खाजगी प्रवासी वाहतुकदारांकडून मनमानी कारभार करून बस भाड्यामध्ये अचानक वाढ केली जाते. आणि ही प्रतिवर्षीची समस्या आहे. तरीही यावर कठोर उपाय योजून प्रवाश्यांना दिलासा देण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रवासी हवालदिल आणि वाहतूकदार त्यांची बिनदास्तपणे लयलूट करत आहेत. कोणाचीच धास्ती नसल्याने ते निर्धास्त आहेत.जनतेला पदोपदी समस्यांचा कसा सामना करावा लागतो याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. एरवी छोट्या मोठ्या प्रकरणाची 'ब्रेकिंग न्यूज' म्हणून बाऊ करणारी प्रसारमाध्यमे या व्यवसायाबद्दल मोकळेपणे वाच्यता करत नाहीत वा एखादे 'स्टिंग ऑपरेशन' ही करत नाहीत. हा काय प्रकार आहे, हे अद्याप कळाले नाही. लाखो प्रवाश्यांना याचा त्रास होतो हे वास्तव प्रसारमाध्यमे वेळोवेळी का मांडत नाहीत? यात मोठा भ्रष्टचार आहे? असे त्यांना का वाटत नाही?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!