मृत गुरुदास नन्नावरे यांच्या कूटुंबीयांना डॉ .सतीश वारजुकर यांनी दीला मदतीचा हात -  कांग्रेस चा पुढाकार

मृत गुरुदास नन्नावरे यांच्या कूटुंबीयांना डॉ .सतीश वारजुकर यांनी दीला मदतीचा हात -  कांग्रेस चा पुढाकार
    नेरी ( प्रतीनीधी )-
शुभम बारसागडे:
          चिमूर तालुक्यातील पिंपळगांव येथे वीज पडून गुरुदास सहादेव नन्नावरे वय २९ वर्ष या युवकाचा जागीच मृत्यू झाला असून त्यासोबत पाच जनावरे ठार झाली .असल्याची घटना १० ऑगस्ट ला ५ वा. घडली .
काल ४- ५ वाजताच्या दरम्यान मेघगर्जनासहीत वीजेच्या कडकडे सहीत आलेल्या पावसाने गुरुदास सहादेव नन्नावरे बैलाच्या गाेठ्यात असलेल्या या युवकावर नीसर्गाच्या काेपाने वीज पडली व त्यात हा युवक जागीच ठार झाला .व त्याचा वडील सहादेव नन्नावरे या नीसर्गाच्या काेपात जखमी झाला .ही घटना माहीत हाेताच लगेच चिमूर विधानसभा कांग्रेस चे नेते तथा जी. प. गट नेते डॉ .सतिश वारजूकर यांनी घटना स्थळी भेट दिली . असता शासकीय अधिकारी पोहचले नव्हते , त्यांना सुद्धा माहिती पुरविली . व मृतकाच्या वडिलांची प्रकृतीची चौकशी करून एक्सरे व ईसीजी तसेच रुग्णवाहिका साठी सहकार्य करून मदत करण्यात आली . गुरुदासचा शव चिमूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आल्यावर कांग्रेस चे जी. प .नेते डॉ .सतीश वारजूकर यांनी वैधकीय अधिकारी यांचेशी भेट घेऊन शव विच्छेदन करण्यासाठी लावले असता शवफ विच्छेदन करण्यासाठी पुढाकार घेण्यात आले .मृतकाच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यात आले . यावेळी  ,नगरसेवक विनोद ढाकुंनकर न .प .चे विरोधी गट नेते अब्दुल कादिर शेख  , पंचायत समीती गटनेते राेशन ढाेक , अमाेद गाैरकार ,  युवक कांग्रेस विधान सभा उपाध्यक्ष ,अवि  अगडे, विलास मोहिनकर आदी कांग्रेस पदाधिकारी व मृतकाचे नातेवाईक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!