नेरी येथे गुड मॉर्निंग पथक सुरू करा

नेरी येथे गुड मॉर्निंग पथक सुरू करा
नेरी प्रतिनिधी,
शुभम बारसागडे:
                   देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 2 अक्टोबर 2014 ला  महात्मा गांधी यांचे जन्म दिवसा निमित्य स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केली. याचा उद्देश गावात स्वच्छता, तसेच गावात जागोजागी सार्वजनिक शौचालये बांधकाम करण्यात आली. आणि लोकांनां खुल्यामध्ये शौचालय जाण्यापासून परावृत्त करण्याचे काम सुरू झाले. मात्र सुरुवातीला याचा प्रत्येक राजकारण्यांनी मोठ्या प्रमाणात उधो उधो केला. मात्र इतक्या लवकरच या सत्ताधार्यांना याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे.
       नेरी येथील टिळक वार्डातील शिवमंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर खुल्यावर शौचास बसणाऱ्यांची संख्या ही वार्डातील बांधलेल्या शौचालयापेक्षाही जास्त असल्याचे तिथून ये-जा करणारे नागरिक सांगत असतात. सुरुवातीच्या काळात काही दिवस का होईना पण प्रशासनाकडून पहाटेच्या सुमारास कर्मचार्यांमार्फत गस्त घातल्या जात होती त्यामुळे अनेकांनी सार्वजनिक शौचालयाचा वापर सुरू केलेला होता. मात्र हळू हळू गस्त घालणे बंद झाल्याने बाहेर बसणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढली. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असुन या दुर्गंधी मुळे अनकाना आजारांची लागण सुद्धा नाकारत येत नाही.
      त्यामुळे या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन प्रशासनाने गुड मॉर्निंग पथक शिव मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर राबवावे अशी मागणी वार्डातील राहिवाश्यांद्वारे करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!