वेंडर अॅक्ट लागू करून किरकोळ व्यावसायिकांना संरक्षण द्यामूल येथे मागणी

वेंडर अॅक्ट लागू करून किरकोळ व्यावसायिकांना संरक्षण द्या
मूल येथे मागणी
किरकोळ व्यावसायिकां करिता केंद्र सरकारने वेंडर अॅक्ट लागू केला असताना मूल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने दुकाने हटविण्याची दिलेली नोटीस परत घेऊन या  व्यावसायीकांना संरक्षण द्यावे  अशी मागणी केली आहे.
नगर परिषद हद्दीत गावातील बेरोजगार युवक व महिलांनी आपला व आपल्या कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी किरकोळ व्यवसाय करीत आहेत.
मूल शहरात न.प.चे किंवा इतर कोणत्याही यंत्रणेचे व्यापारी संकुल नाही. तसेच खाजगी व्यक्तींचेही व्यापारी संकूल नाहीत, त्यामुळे या व्यवसायायीकांना  शासकीय जागेवर व्यवसाय करुन उदरनिर्वाह करावा लागत आहे.
व्यवसाय जरी शासकीय जागेवर असला तरी सर्व व्यवसाय कायदेशीर मार्गानेच करीत असल्याचे या व्यावसायिकांनी म्हटले आहे. न.प. ने आकारणी केलेले व्यावसायीक व बाजार फि  देत आहेत. आमच्या या व्यवसायामुळे वाहतुकीस व अन्य कोणत्याही प्रकारे अडथळा होत नाही. असा दावाही त्यांनी केला आहे.
किरकोळ व्यावसायीकांना संरक्षन देण्यासाठी स्टी्ट वेंडर अॅक्ट 2014 लागु केला आहे व या कायदयाची निमयावलीही राज्य शासनाने तयार केली आहे. व यातून रस्त्यावर बसून किरकोळ विक्रेते व्यवसाय करु शकतात हे शासनाने मान्य केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!