सावली तालुक्यात मतदार नोंदणीचा फज्या
मतदार नोंदणी अभियानाची मुदत संपत आली असतानाही नोंदणी अर्ज मतदार केंद्रावर उपलब्ध नसल्याने नवीन मतदारांना मतदानापासून वंचित राहण्याची पाळी तालुक्यात येत आहे. लोकशाही देशात मतदानाला फार महत्त्व आहे,मतदार यादीत नाव असल्याशिवाय कोणत्याही निवडणुकीत मतदान करता येत नाही.मतदार यादी अद्यावत ठेवण्यासाठी दरवर्षी मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येते.गावातील मतदान केंद्रावर ही जबाबदारी तालुका निवडणूक अधिकारी यांचेकडून दिल्या जाते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!