आदिवासींच्या जमिनीसाठी आंदोलन तीव्र करणार. अॅड. पाराेमिता गाेस्वामी
आदिवासींच्या जमिनीसाठी आंदोलन तीव्र करणार.
अॅड. पाराेमिता गाेस्वामी
जिवती तालुक्यातील आदिवासीच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर गैरआदिवासीनी बळजबरीने बळकावली आहे. या जमिनी कायदेशीर मार्गाने परत मिळवून घेवू असे मत श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी व्यक्त केले. त्या नंदप्पा येथे ब़लत होत्या.
आदिवासींच्या हक्कासाठी श्रमिक एल्गार कार्यशिल असल्याने तालुक्यातील आदिवासींवर हाेत असलेले अऩ्याय सहन करनार नाही प्रशासन आदिवासी विराेधी भुमिका घेत असुन नंदप्पा येथिल आदिवासी जैराम काेरवेते यांचे जमीन प्रकरणात श्रमिक एल्गारचे महासचिव सहीत २५ आदिवासी बांधवावर पिट्टीगुडा येथिल पाेलीसांनी खाेटे गुन्हे दाखल केले आहे. गैरआदिवासी काेर्टाच्या आदेशाचा अवमान करत बळजबरीने आदिवासीचे वाहीतीचे शेतात पेरणी करुन सुद्धा पाेलीसांनी साधा नाेटीसही गैरआदीवासीला दिला नाही ही बाब शंका निर्माण करनारी आहे. पाेलीसच कायदा माेडत असल्याचे चित्र दिसत असल्याचा त्यांनी आरोप केला.
श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष विजय सिद्धावार यांनी मार्गदर्शन केले तर छाया सिडाम , घनशाम मेश्राम महासचिव, जालिम काेडापे, तालुका अध्यक्ष, नामदेव उदे, भिमराव मडावी यांनी मनाेगत व्यक्त केले सभेत पल्लेझरी, आंबेझरी, सगनापुर, भाेक्सापुर, आनंदगुडा, झालीगुडा , भाईपठार, बेलगाव, माथाडी, घारपना, येरमियेसापुर, काकबन, दमपुर माेहदा, गुडशेला पाटण, खडकी हिरापुर येथुन शेकडाे लाेक उपस्थित झाले हाेते सभे नंतर जमिनी च्या समस्या समजुन अनेक आदीवासींच्या जमिनी आजही गैरआदीवासींच्या कब्जात असल्याचे निदर्शनास आले असुन सर्व समस्या प्रशासनासमाेर मांडण्यात येईल आदिवासींच्या जमिनी प्रशासन परत न मिळवुन दिल्यास जिल्ह्यात माेठा आंदाेलन उभा करण्यात येनार आहे
सभेच्या यशस्वितेसाठी परशुराम वेलादी , घागरु मडावी, जैतु कुळमेथे, नितिन ऊदे, व ईतर कार्यकर्ते परीश्रम घेतले


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!