शास.औ.प्र.संस्थेत जागतिक युवा कौशल्य दिन संपन्न स्कील इंडीया मिशन हा शासनाचा बहूआयामी अभिनव उपक्रम - प्राचार्य विसाळे गडचिरोली

शास.औ.प्र.संस्थेत जागतिक युवा कौशल्य दिन संपन्न
स्कील इंडीया मिशन हा शासनाचा बहूआयामी अभिनव उपक्रम - प्राचार्य विसाळे गडचिरोली  (प्रतिनिधी )शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे वतीने जागतिक युवा कौशल्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अनंत सोमकुंवर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य के. एस. विसाळे होते. प्रमुख अतिथी म्हणून नंदनसिंग भुकवाल प्रकल्प अधिकारी आदिवासी आश्रम शाळा कोरची,महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ चे  जिल्हा व्यवस्थापक सौ. वाय. एस. शहारे, संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एम. ढगे, म. रा. इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. पी. बावनकर, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक के. व्ही. शेरकी, बँक आँफ इंडीयाचे पी. डी. काटकर, एस्कार्ट ट्रँक्टर चे एरीया मँनेजर ओपेश्वर रहिले आदींची उपस्थिती होती. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!