पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांनी सक्रियतेने काम करणे गरजेचे--विधानपरिषद उपसभापती माणिकराव ठाकरे
पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांनी सक्रियतेने काम करणे गरजेचे--विधानपरिषद उपसभापती माणिकराव ठाकरे
दिग्रस येथे काँग्रेस कमेटीची आढावा बैठक संपन्न
दिग्रस (साजीद पतलेवाले):- केंद्र व राज्यातील भाजप सरकार सर्वच आघाड्यावर स्पशेल कुचकामी ठरली आहे.म्हणूनच कास्तकार कर्मचारी व व्यापाऱ्यासह सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्या विरोधात प्रचंड रोष खदखदत आहे.तरी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी नव्याने पक्ष बांधणीसाठी सक्रियेतेने कार्य करणे अत्यंत गरजेचे आहे असे मत विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी प्रतिपादन केले.
दिग्रस येथे आज दि.३ वाजता शासकीय विश्रामगृहात आयोजित काँग्रेस कमिटीच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करतांना ते बोलत होते.यावेळी काँग्रेसचे जेष्ठ व माजी मंत्री शिवाजीराव मोघे,माजी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वसंतराव पुरके,जिल्हाध्यक्ष डॉ.वजाहत मिर्झा,माजी आमदार विजयाताई धोटे,जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे,जीवन पाटील,पंचायत समिती सदस्या सुलोचना कांबळे,जी.प.माजी अध्यक्ष राहुल ठाकरे,अनिल आडे,उषा लोळगे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी अनेक मान्यवरांची पक्ष बांधणी मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हासरचिटणीस राजा चौहान,तालुका अध्यक्ष वसंतराव निरपासे,अड.सुधाकर जाधव,राजीव मोघे,शंकर जाधव,नगरसेवक किशोर साबु,कैलास चव्हाण,विजय घाटे,माजी पंचायत समिती सभापती अरुण राठोड,माजी सभापती विविध कार्यकारी संस्था श्रीराम शिंदे,सुनील वानखडे,सलीम पटेल,इफ्तेखार खान, संतोष राठोड,बाळू इंगोले,प्रा.ज.सा.गवळीकर,बाजार समितीचे माजी सभापती भारत देशमुख,माजी जिनिंग प्रेसिंग अध्यक्ष अ.हक,रामेश्वर राऊत आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.या प्रसंगी उषा लोळगे यांचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे व कार्यकर्त्यांच्या उपस्थित प्रवेश झाला.
या सभेचे प्रास्ताविक सलीम पटेल यांनी केले,सूत्रसंचालन राजा चौहान तर आभार प्रदर्शन वसंतराव निरपासे यांनी केले.या सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

