शिवसेनेच्या पुढाकाने देवनगर येथून शहर बससेवा सुरू

शिवसेनेच्या पुढाकाने देवनगर येथून शहर बससेवा सुरू
दिग्रस :- प्रतिनिधी (साजिद पतलेवाले)
          सध्या नागपूर- नांदेड राज्य मार्गावरील दिग्रस -पुसद पुलाचे बांधकाम सुरू आहे रहदारीसाठी पुलाच्या बाजुने तयार केलेला वळण रस्ता धावंडा नदीला आलेल्या पुरात वाहून गेला त्यामुळे देवनगर वासीयांचा दिग्रस शहराशी संपर्क तुटल्यामुळे येथिल नागरिकांना ४ कि.मी. चा फेरा करत पुसद बायपास मार्गे शहरात जावे लागत आहे.