भीक नको पण कुत्र आवर.. !
भीक नको पण कुत्र आवर.. !
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात साला आणि दाजी गाजत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतक—यांना ‘साले अजूनही रडतात’ असे धक्कादायक, शेतकयांचा अपमान करणारे, शेतक—यांच्याच्या स्वाभीमानावर जखम करणारी भाशा आपल्या राज्यकत्र्यांना निश्चितच शोभणारी नाही.
मागील काही वर्षापासून राज्यात शेतकरी आत्महत्येचे प्रकार वाढत आहे. शेतक—यांना कर्जमाफी द्यावी.. शेतक—यांसाठी असलेला स्वामीनाथन् आयोग लागू करावा.. अशा मागण्या घेवून आताचे सत्ताधारी विरोधी पक्षात असतांना, आणि आताचे विरोधक सत्तेत असतांना करीत होते. त्यातच उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्र्यांनी तेथील शेतक—यांचे एक लाख रूपयापर्यंतचे कर्ज माफ केल्यानंतर, महाराष्ट्रातही कर्जमाफीची मागणी जोर धरली आहे. ही मागणी कायम असतांनाच सरकारचे तुरीचे धोरण चुकल्यांने नवाच गोंधळ सुरू झाला. हा गोंधळ थांबण्यांची चिन्हे दिसत असतांनाच, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी शेतक—यांनाच ‘साले रडतात’ म्हणून त्यांचा उपहास केला. दानवे यांचे वक्तवाचा राज्यभर निषेध झाला-चालू आहे, तो व्हायलाच पाहिजे.
राज्यकत्र्यांकडे शेतक—यांनी काही मागीतले तरी ते देत नाहीत. अनेक राज्यकर्ते अशा मागण्याकडे दुर्लक्ष करतात, सरकारनी शेतक—यांना काही देवू नये पण किमान स्वाभीमान तरी द्यावा ना? साले म्हणून शेतक—यांचा अपमान करण्यांचा त्यांना काय अधिकार? भीक नको पण कुत्रा आवर अशी आजची परिस्थिती असल्यांचे दानवे प्रकरणावरून दिसून येते.
परिस्थिती चिघडल्यानंतर दानवे यांनी ‘मी तसे बोललो नाही, शेतक—यांना जर वाईट वाटले असेल तर मी दिलगीरी व्यक्त करतो’ असे म्हणत या वादावर पडदा टाकण्यांचा प्रयत्न केला. म्हणजे शेतक—यांना साले म्हटल्यांवर वाईट वाटणार नाही हे या जानवेनी कसे गृहीत धरले? आणि माफीही नाही केवळ दिलगीरी?
रावसाहेब दानवेच्या प्रकरणानंतर, लगेच त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्यांची काही राजकीय नेत्यांनी मागणी केली, ही मागणी मात्र बालिापणाची आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष कोणत्या प्रवृत्तीचा असावा हे इतर राजकीय पक्षानी का ठरवावे? त्यापेक्षा दानवेनी खासदारकीचा राजीनामा द्यावा किंवा पंतप्रधानानी त्यांचेकडून तो घ्यावा ही मागणी संयुक्तीक राहीली असती, मात्र संधी मिळताच राजकीय नेते, ‘उचलली जीभ लावली टाळूला’ प्रमाणे वागत आहे. शिवसेनेने तर जानवेची जीभ कापून आणणा—यास दहा लाखाचे बक्षिस जाहीर केले आहे, हा दुसरा सत्ताधारी पक्षाचा बालिशपणा आहे. पैशाच्या जोरावर दुस—यांना गुन्हे करण्यासाठी का लावता? तुम्ही काय करता? तुमच्यात ती हिम्मत नाही तर फक्त प्रसिध्दी मिळविण्यांच्या हव्यासापोटी काहीही घोषणा करता? त्यापेक्षा या सर्वांनी रावसाहेब दानवे यांनी खासदारकीचा राजीनामा दिला पाहिजे यासाठी दबावतंत्राचा वापर केला असता तर महाराष्ट्रातील शेतकरी सुखावला असता हे निश्चित !