बीपीएल मध्ये नांव येवून 14 वर्ष लोटूनही त्याला घरकुलापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे
नवेगांव (ज्ञानेश आत्राम) विरूर स्टेशन पासून 3 कि.मी. अंतरावर असलेल्या नवेगांव येथील प्रल्हाद केशव आडे या आदिवासीचे बीपीएल मध्ये नांव येवून 14 वर्ष लोटूनही त्याला घरकुलापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. 2003 पासून प्रल्हाद बीपीएल मध्ये आहे. त्यांचे घर पूर्णतः मोडकळीस आले आहे. कोणत्याही क्षणी हे घर कोसळू शकते. नवे घर बांधण्यासाठी किंवा आहे त्या घराचे दुरूस्तीसाठी त्यांचेकडे पैसे नाही.
जिल्हा परिषदेने त्यांचे घरकुलांचे योजनेतून घर बांधून द्यावे यासाठी तो प्रयत्न करीत आहे. बीपीएल मध्ये त्याला 21 गुण असून, 20 गुणापर्यंतच्या सर्वांचे घरकुल पूर्ण झाले आहेत. जिल्हा परिषदेने पंचायत समिती राजूराला पत्र देवून प्रल्हादच्या घरकुलाचे प्रस्ताव पाठविण्याबाबत कळविले आहे, मात्र प्रशासन ढिम्म असल्यांने प्रल्हाद व त्याचे कुटूंबिय घरकुलापासून वंचित असल्यांचा आरोप केला जात आहे.