चंद्रपूर जिल्ह्यात घरकुल अनुदानाचे वांदे!
बांधकाम पूर्ण होवूनही अनुदान देण्यास टाळाटाळ !!
जिल्हा परिषद चंद्रपूर मार्फत वेगवेगळया योजनेतून बांधण्यात येणा—या घरकुलांचे अनुदानाचे वांदे निर्माण झाले असून, काम पूर्ण होवूनही वेळेत अनूदान मिळत नसल्यांने लाभार्थात असंतोष निर्माण झाला आहे. लाभार्थाना अनुदान देतांना द्यावयाची टक्केवारी, ई-पेंमेटचा घोळ, अधिका—यांचे दुर्लक्ष आणि लाभार्थांचा एकाकी लढा यामुळे पात्र असूनही अनेक लाभार्थांना अनुदानासाठी पंचायत समितीचे उंबरठे गाठावे लागत आहे.
घरकुल ही सामान्यांचे विशेषतः महिलांचे स्वप्न असते. वाढत्या महागाईत स्वमिळकतीत घर बांधणे शक्य नसल्यांने शसनाची घरकुलांची योजना आहे. ही योजना जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेच्या माध्यमातून राबविण्यात येते. सध्या 1 लाख 20 हजार रूपयाची योजना असून, तीन टप्यात योजनेचे अनुदान वितरीत करण्याचे धोरण आहे. सुरूवातीला बांधकामासाठी पहिला टप्पा, छत लेवल दुसरा टप्पा तर छतपूर्ण झाल्यानंतर अंतिम देयक काढण्याची तरतूद आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीमध्ये लाभार्थांना घरकुल मंजूर झाल्यानंतर त्यांनी आपले कच्चे घर तोडून, झोपड्या काढून नव्या घराचे काम सुरू केले. पहिल्या टप्याचे अनुदान मिळाले. त्यानंतर या लाभार्थांना छतापर्यंतचे काम करून फोटोसह आवश्यक बाबीची पूर्तता केल्यानंतर महिणा लोटल्यानंतरही अनुदान मिळाले नाही. काहीनी तर उधारीवर सामान घेवून, नातेवाईक, आप्तेष्टांना उसनवारीने पैसे घेवून घराचे काम पूर्ण केले, मात्र त्यांनाही अजूनपर्यंत दुसरा अनुदान मिळाला नसल्यांने हे सर्व लाभार्थी हवालदिल झाले आहे. या लाभार्थांत मोठया प्रमाणावर आदिवासी, दलित व भटक्या समाजातील असून लवकरच पावसाळा सुरू होण्यांची शक्यता असल्यांने तातडीने अनुदान न मिळाल्यास, अर्धवट घरात संसार कसा उभारायचा या विवंचनेत ते आहेत.
अनुदान आता थेट बॅंकेत लाभार्थांच्या खात्यावर जमा होत आहे. त्यामुळे लाभार्थांनी पंचायत समितीमध्ये संबधीतांना ‘प्रसाद’ दाखविल्याशिवाय बिल मंजूरीचे कामे पूर्ण करीत नाहीत. उधारीचेच पैसे द्यायला नाही तेव्हा बाबूच्या खाबूगीरीसाठी कुठून पैसे आणायचे असा सवाल हे लाभार्थी करीत आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यातील एकारा, बोदरा, तळोधी, गांगलवाडी, कसर्ला, चक बोथली, वायगाव या गावातील घरकुल लाभार्थी अनुदान मागणीसाठी पंचायत समितीत गेले असता, तेथील अधिका—यांनी ‘‘तुमचे पैसे परत गेले, आता अनुदान विसरा’’ असा सल्ला देत आहेत. पैसे परत कसे गेले हे सांगायला कुणीही तयार नसल्यांचे या लाभाथ्र्यांचे म्हणणे आहे. चंद्रपूर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले आणि ताडोबाच्या कोअर झोनला लागून असलेल्या डोणीच्या 25 लाभार्थांच्या घराचे काम छतापर्यंत पूर्ण होवूनही त्यांना अनुदानाचा दुसरा टप्पा मिळालेला नाही. संवर्ग विकास अधिकारी आनंद पवार यांनी या बाबीला दुजोरा दिला व तांत्रिक अडचणीमुळे ई-बिल जनरेट होत असल्यांची बाब पुढे केली. शासनाच्या तांत्रिक चुकिचा फटका बसलेले डोणीचे आदिवासी अनुदानासाठी पायपिट करीत आहे.
सावली तालुक्यातील मेहा येथिल सूर्यभान पेंदाम, विनायक कवासे, इंदूबाई भैसारे विश्वेश्वर गेडाम, यांचे सजा लेवल पर्यंत घर झाले फक्त एक हप्ता मिळाला तर लिलाबाई लाकडे, भिवाजी नंदेश्वर यांचे घराचे काम पूर्ण होवून सूध्दा दोनच हप्ते मिळाले. तर भागरथा गंडाटे, बाबू कूरेशी यांचा जोता लेवल पूर्ण झाले असून दूसरे बिल द्यायचे असतांना शासन अजूनही दूसरे बिल दिले नाही. मूल तालूक्यातील डोणी या आदिवासी गावात भूजंगराव कन्नाके, हरीदास कन्नाके, बंडू सिडाम, विजयाबाई मेश्राम, बारूबाई अलाम, अंबादास अलाम देविदास सिडाम, गजानन सिडाम, रामनाथ सिडाम, रत्नमाला कूळमेथे, कलषाहा अलाम, प्रभाकर येळमे, रामकृष्ण गेडाम, धर्मराव कूमरे, भारजाबाई कूळमेथे, भयाजी अलाम, शालीक गेडाम, अमृत अलाम, दादाजी नैताम, हरीचंद्र नैताम, बयाबाई गेडाम, दिवाकर कुळमेथे, मंदा नैताम यांचे घर छतलेवल होवून सुध्दा पहीलाच बिल मिळालेला असून जिवती तालूक्यातील बेलगाव येथिल रामबाई आत्राम हीचे घर पूर्ण झाले असतांना एकच बिल दिल्या गेला असल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे. रामबाई पंचायत समितीला बिलासाठी जात आहे. मात्र उडवाउडविचे उत्तरे देवून तिला वापस पाटवितात. याकडे शासन लक्ष देईल काय याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.