श्रमिक एल्गारने केला व्यसनमुक्त नागरीकांचा सत्कार
दारू सोडलेल्या नागरीकांचा सत्कार
चंद्रपूर जिल्हा दारूबंदीनंतर, दारूचे व्यसन सोडलेल्या नांदेड, कोजबी व गिरगांव गावातील नागरीकांचा सत्कार, शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून करण्यात आला. ब्रम्हपुरी उपविभागीय स्तरावर नागभीड येथील रूख्मीनी लॉनमध्ये महिला दारूबंदी जनसुनवाई व क्रांतीकन्या सन्मान पुरस्कार वितरण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. दारूबंदीच्या वर्षपूर्ती निमीत्त वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चंद्रपूर जिल्हा दारूमुक्ती अभियानच्या वतीने जिल्हयात उपविभागीय स्तरावर 'महिला दारूबंदी जनसुनवाई' व ज्या महिलांनी मागील एक वर्षात गावात दारूबंदीचे उल्लेखनीय कार्य केले अशा महिलांना 'क्रांतीकन्या सन्मान पुरस्कार' देण्यांचा कार्यक्रम घेण्यात येत आहे. नागभीड येथे संपन्न झालेली जनसुनवाई ही चौथी जनसुनवाई आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अॅड. गोविंद भेंडाकर होते. या कार्यक्रमास सामाजीक कार्यकर्ते आबिदभाई, नागभीड तालुका श्रमिक एल्गारचे अध्यक्ष श्रीराम शेंडे उपस्थित होते.
यावेळी विविध गावातून आलेल्या दहा महिलांनी दारूबंदीनंतर आलेले अनुभव व्यक्त केले. दारूबंदीनंतर दारूची उपलब्धता कमी असली तरी भंडारा जिल्हयातून अवैद्य दारू पुरवठा केला जात असल्यांने, हि दारू बंद करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी नांदेड, नवेगांव पांडव, अडयाड, जवराबोडी मेंढा येथील महिलांना 'क्रांतीकन्या सन्मान पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमात अॅड. पारोमिता गोस्वामी, आबिद अली, विजय सिध्दावार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन अनिल मडावी यांनी तर आभार प्रदर्शन सपना कामडी यांनी केले.