दारूबंदी कायद्यांतर्गत दोघांना करावास चंद्रपूर जिल्ह्यातील पहिलाच निकाल
दारूबंदी कायद्यांतर्गत दोघांना करावास
चंद्रपूर जिल्ह्यातील पहिलाच निकाल
दारूबंदी कायद्यांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील दोन प्रकरणात न्यायालयाने तिघांना तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर आता चंद्रपूर जिल्ह्यातील दोन प्रकरणांमध्ये दोघांना तीन वर्षे सश्रम कारवास ठोठावण्यात आला आहे. दारूबंदीनंतर शिक्षेची चंद्रपूर जिल्ह्यातील ही पहिलीच घटना ठरली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यत 1 एप्रिल 2015 पासून दारूबंदी लागू करण्यात आली. 1 एप्रिल 2015 ला शेगाव पोलिस स्थानकाचे प्रभारी अधिकारी प्रवीण डांगे यांनी आमडी येथील नेपाल सोमनाथ डरे यांच्या घरी धाड घातली. अवैधरित्या बाळगलेली 35 नग देशी दारूच्या सीलबंद बाटल्या जप्त करून गुन्ह्याची नोंद केली. त्यावेळी आरोपीला अटकही करण्यात आली होती. आरोपीविरोधात दोशारोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने सुनावणीदरम्यान साक्षीदार तपासले, योग्य पुराव्याच्या आधारे नेपाल डरे यांना वरोरा न्यायालयाच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आनंद करभाजन यांनी मुंबई दारूबंदी कायद्यांतर्गत तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. तर दुस—या एका प्रकरणात विना परवाना व अवैध दारू बाळगल्यावरून 2 मार्च 2015 रोजी वाल्मिकी नत्थू वाढई याला शेगाव येथील बस स्थानक परिसरातून पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून नग देशी दारूच्या सीलबंद बाटल्या जप्त करून गुन्हयाची नोंद करण्यात आली होती. अटकही झाली होती. आरोपीविरोधात दोशारोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयाने सुनावणीदरम्यान साक्क्ष तपासत पुराव्यांच्या आधारे वाल्मिक वाढई यास वरोरा न्यायालयाच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आनंद करभाजन यांनी मुंबई दारूबंदी कायद्यान्वये तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
दोन्ही प्रकरणात सरकारतर्फे वरोरा येथील अभियोक्ता म्हणून संजय आर. ठावरे यांनी काम पाहिले.
ठळक कायद्यांची मदत
दारूबंदीचे सकारात्मक परिणाम मोठया प्रमाणवर दिसले असून आता याबाबतचे कायदेखील कडक केले जाणार असल्याचे स्पष्ट संकेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते. त्या पाश्वभूमीवर आलेले चार निकाल महत्वपूर्ण मानले जात आहेत.