श्रमिक एल्गारच्या आंदोलनाने रोहयो कामाला सुरूवात

सावली तालुक्यातील अंतरगाव येथील मजूरांना रोजगार देण्यास टाळाटाळ करणा—या ग्राम पंचायती विरूध्द श्रमिक एल्गारचे गाव कमेटीने आंदोलनाचे अस्त्र उगारताच या मजूरांना काम देणे भाग पडले.
अंतरगाव तालुका सावली येथील 85 मजुरांनी मिळुन दि. 29-03-2016 रोजी रोजगार हमीच्या नियमाप्रमाणे रितसर ग्रामपंचायत अंतरगाव यांच्याकडे कामाची मागणी केली. नियमाप्रमाणे पंधरा दिवसात मजुरांना ग्रामपंचायत प्रशासनाने काम दिले नाही. त्यामुळे दिनांक 18-04-2016 रोजी सर्व मजुर श्रमिक एल्गारचे पुढाकाराने सावली तालुका अध्यक्ष श्री रामचंद्र हुलके यांचे नेेेेतृत्वात ग्रामपंचायत कार्यालयासामोरच मजुरांना घेवून ठिया मांडला व ग्रामपंचायत प्रशासनाला हालवून सोडले. असता ग्रामविकास अधिकारी यांनी ताबडतोब पंचायत समिती गाठुन या सर्व मजुरांचे ईमस्टर तयार करून घेतले व दिनांक 19-04-2016 पासुन श्री नामदेव मानकर यांच्या घरापासून ते गाव तलाव पर्यत पांधन रस्त्याचे काम ताबडतोब सुरू करण्यात आले. या आंदोलनात श्रमिक एल्गारचे कार्यकर्ते श्री रामचंद्र हुलके, प्रकाश करकाडे, गुरूदास, बंडु वसाके, रामदास आवडे, सरस्वता करकाडे, शोभा हुलके, चंदा वसाके, शीला गेडाम, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.