मूल तालुक्यात बाटली आटली

 darubandi साठी प्रतिमा परिणाम
मूल तालुक्यात बाटली आटली
।। दिनेश घाटे ।।
अवैद्य दारू विक्रेत्यांवर होणा—या दारू विक्रेत्यांचे सातत्य आणि बडया दारू तस्करांची धरपकड यामुळे मुल तालुक्यातील अवैद्य दारू पुरवठा अल्प प्रमाणात झाल्याने बाटली आटली असल्याचे चित्र  निर्माण झाले आहे. त्यामुळे महिलांत समाधान व्यक्त केल्या जात आहे.
चंद्रपुर जिल्ह्यातील श्रमिक एल्गार संघटनेच्या अॅड.पारोमिता गोस्वामी यांनी सन 2010 मध्ये वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चंद्रपूर जिल्हा दारूमुक्ती अभियान सुरू केले. अभियानच्या माध्यमातुन पदयात्रा, जेलभरो, महीलांचे मुंडन, अशी विविध आंदोलने व एक लाख सहयांचे अभियान, पोस्ट कार्ड अभियान, ग्रामसभेचे ठराव अशी विविध उपक्रम राबविण्यात आले. या आंदोलनाची दखल आघाडी सरकारने घेतली होती व चंद्रपूर येथे लोकसभा निवडणुकीचे प्रचारादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लवकरच चंद्रपूर जिल्हयात दारूबंदी होणार असल्याचे सूतोवाच केले मात्र मुंबईत गेल्यानंतर विसरले ती बाब वेगळी. त्यानंतर या महिलांच्या मागणीची हाक मूल-बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ऐकली व निवडणुकी दरम्यान महीलांना शब्द दिला की, राज्यात युतीची सरकार आल्यास चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी करणार म्हणजे करणारचं असे ठोस आश्वासन दिले. आणि भाजप युतीची सरकार आल्यावर त्यांनी 1 एप्रिल 2015 पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली.
      जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर शांततेचे वातावरण निर्माण झाले असतांनाच काही असामाजीक तत्वांच्या लोकांनी अवैदय दारूविक्री सुरू केली. श्रमिक एल्गारच्या कार्यकत्र्यांनी अवैध दारू बंद करण्यासाठी पुढाकार घेतला होता मात्र या कारवाईमुळे पोलीसांचे कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याने पोलीस व दारू तस्करांच्या संगनमताने मुल येथिल कार्यकत्र्यांवरच खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे तत्कालीन ठाणेदारांची बदली करण्यात आली व त्याजागी ओमप्रकाश कोकाटे हे नविन ठाणेदार रूजू झाले. कोकाटे रूजू होताच दारू विक्रेत्यावर लगाम लावला आहे. त्यांनी अवैदय दारूविक्रेत्यांचे विरोधात मोहिम उघडल्याने मोठा दारूसाठा व मुद्देमालासह आरोपी गजाआड होत असल्याने तालुक्यातील नागरीकांनी समाधान व्यक्त करित आहे. मूल तालुक्यातील एका ठोक दारू विक्रेत्याला पकडल्याने ठाणेदार कोकाटेंचे अनेकांनी अभिनंदनही केले. असेच ठाणेदार जिल्ह्यातील तालुक्याच्या ठाण्यात असले की नक्कीच अवैदय दारूवर पूर्णपणे आळा बसेल यात दुम्मत नाही. मुल तालुक्यातील चैकीच्या ठिकाणी असणारेही पोलीस कडक कारवाही करित आहेत. पोलीसांनी कर्तव्यदक्ष राहुन आपली भूमीका पार पाडत असल्याने मूल तालुक्यातील बाटली आटली असल्याचे चित्र दिसत आहे.
ठाणेदार कोकाटे कोठपर्यंत राहणार व दारूबंदी कोठवर टिकणार हाही प्रश्न आहे. हा प्रश्न साहजिकच मनात येतोच. याला जोड लोकसहभागाची पाहीजे. जो पर्यंत लोकसहभाग राहणार नाही तोपर्यंत कोणतीही गोष्ट शक्य नाही. ज्या दारूमुळे माझे कुटुंब बरबाद होत आहे, ज्या दारूमुळे माझा मुलगा, वडील, पती व संसार बरबाद होत आहे, आपल्या बाजुच्या परीवारात दारूमुळे नुकसान होत आहे. आपन समाजाला काहीतरी देणं लागतो. असे वाटुन दारूबंदी हे माझे काम आहे असे जोपर्यंत वाटणार नाही तोपर्यंत संपुर्ण दारूबंदी होणार नाही हे सर्वाना ज्ञात आहे.