दारूचे प्रकरण दडपणा—या पोलीस पाटलाला अटक

दारूचे प्रकरण दडपणा—या पोलीस पाटलाला अटक
भद्रावती: तालुक्यातील सितारामपेठ येथील पोलीस मित्रांनी अवैध दारू विक्रेत्याची दारू पकडून प्रकरण येथील पोलीस पाटलाकडे नेले. मात्र  पोलीस पाटलाने आरोपींकडून पकडलेले दारूच्या काही बाटल स्वतः जवळ ठेवून आरोपीला सोडून दिले. ही बाब भद्रावती पोलिसांना माहिती होताच दारू विक्रेत्यासह पोलीस पाटलावर कारवाई करुन अटक करण्यात आली.
आसिम हिमचंद सरदार (32) रा. बंगाली कॅम्प चंद्रपूर असे दारूविक्रेत्याचे तर गुलाब नामदेव गेडाम रा. सिताराम पेठ असे पोलीस पाटलाचे नाव आहे. शुक्रवारी आसीम यांची चार हजाराची देशी दारू पोलीस मित्रांनी पकडली. आरोपीला पोलीस पाटील गेडाम यांच्या स्वाधीन केले. या आरोपीवर कारवाई करतो, असे पोलीस पाटलांने सांगितले. नंतर दारू विक्रेत्याबराबेर सेटिंग करुन पकडलेल्या मालापैकी अर्धा माल वाटून घेतला व आरोपीला सोडून दिले. ही बाब भद्रावती पोलिसांना लक्षात येताच आरोपीस अटक केली. आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर केले. त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. भ्रष्ट पोलिस पाटलाला धडा शिकविल्याबद्दल लोक खुश आहेत.