जयभिम हा केवळ शब्द नव्हे तर अंतर्मनाला आत्मविश्वास देणारी शक्ती आहे- ना.मुनगंटीवार

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीविरहीत समाजव्यवस्था, सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले. घटना तयार करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिन, दुर्बल, शोशित, पिडीत, दलित, आदिवासी, अंध, अपंग, निराधार या सर्वच समाजघटकांचा विचार केला. या घटकांना केंद्रबिंदू मानून राज्य कारभार करण्याचा संकल्प बाबासाहेबांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमीत्त आम्ही केला आहे. जयभीम हा फक्त शब्द नव्हे तर आपल्या अंतर्मनाला आत्मविश्वास देणारी शक्ती आहे. आपला आत्मविश्वास तरूणांनी आणि विद्याथ्र्यांनी वाढवावा, जयभीम बोलो- विकास की ओर चलो हा नारा देत समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन वित्त व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केले. बाबासाहेबांनी तयार केलेल्या घटनेच्या चैकटीतच आपला देश आज चालत आहे. प्रत्येकांनी घटनेनुसार वागण्याचे ठरविल्यास घटनेचा मान वाढेल. घटनेचे काटेकोर पालन करण्याच्या निर्धाराचा आजचा दिवस असल्याचे प्रतिपादन ना. मुनगंटीवार यांनी यावेळी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर जयंती महोत्सव समितीच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जगातील अनेक देशात आज बाबासाहेब यांची जयंती साजरी होत आहे, असे प्रथमच घडत आहे. बाबासाहेबानी सर्व समाजाला न्याय मिळावा यासाठी संघर्ष केला. म्हणून त्यांना केवळ एका समाजात बांधता येणार नाही तर ते सर्व देशवासियांचे होते असे ना. हंसराज अहिर म्हणाले. जि.प. अध्यक्षा गुरुनुले, महापौर कंचर्लावार, आमदार शामकुळे, जिल्हाधिकारी डॉ. म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कल्याणकर, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, सहायक आयुक्त समाज कल्याण प्रसाद कुळकर्णी, व्ही. डी. मेश्राम व सत्यपाल काटकर हे यावेळी उपस्थित होते.