दारूबंदी समर्थक गामहीलेस शिविगाळ

दारूबंदी समर्थक महीलेस शिविगाळ
सिंदेवाही पोलीसात आरोपी विरूध्द कारवाई 
सिंदेवाही - तालुक्यातील नवरगांव येथे दारूबंदीसाठी पुढाकार घेणा-या महीलांना दारूडयांकडुन शिवीगाळ झाल्याने त्याचेविरूध्द पोलीसांत कारवाई करण्यात आली.
नवरगांव येथे होळीच्या सणा दरम्यान दारूविक्री होऊ नये यासाठी येथील महीला गस्त घालत होते. या दरम्यान दारूविक्रेत्याला पकडण्याचा प्रयत्न महीलांनी केला परंतू तो पळून जाण्यास यशस्वी ठरला मात्र तिथे पिण्यासाठी आलेल्या किरण निमजे व बन्टी चापडे यांनी श्रमिक एल्गारची कार्यकर्ती वंदना मांदाडे व महीलांना अश्लिल शिवीगाळ करणे सुरू केले. यामुळे महीलांनी शिवीगाळ करणा-यांना चोप दिला व सिंदेवाही पोलीसात तक्रार दिली. या तक्रारीवरून आरोपींविरूध्द भांदवी कलम 294, 323,506 अंतर्गत कारवाई करण्यात आली.