मुरखळात दारूबंदी समितीने पकडली दारू
मुरखळात दारूबंदी समितीने पकडली दारू
गडचिरोली (एन.नंदू)
मुरखळा दारूबंदी समितीने पकडलेली दारू, दुचाकी व अटक केलेले आरोपी चामोर्शी रूमुरखळा येथील दारूबंदी समितीने धाडघालून एक दुचाकी व 9 निपा दारू जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या दारूबंदी समितीला गावशिवारात दारूविक्री केल्या जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार दारूबंदी समितीचे अरूण डांगे, विजय लाड, विनोद मंगर, किरणदास सातपुते, निवेश रामटेके यांनी दारूविक्रेते गोवर्धन नागन्ना सातपल्लीवार (३२) व परशुराम कोटगीलवार (४0) रा. मुरखळा यांच्याकडून 9देशी दारू निपा, दुचाकी वाहन ताब्यात घेऊन याची माहिती पोलीस बिट जमादार विजय काळबांधे, हवालदार आर. एस. धुर्वे यांना दिली. त्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व आरोपी गोवर्धन सातपल्लीवार, परशुराम कोटगीलवार यांच्याकडून मुद्देमाल, दुचाकी वाहन व 9 निपा दारूअसा ४0 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरोधात मुंबई दारूबंदी कायद्याच्या 65 ई, 83 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात एमएच-३३-पी-6655 ही दुचाकी जप्त करण्यात आली आहे. आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे, मात्र चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर, गडचिरोली जिल्हा प्रषासनाने या जिल्हयात चालू असलेल्या अवैद्य दारूवर नियंत्रण आणण्यासाठी कंबर कसली आणि महिला साथ देत आहेत हे विषेश!