मूल तालुक्यातील बेंबाळ ग्राम पंचायतीत लाखोचा घोटाळा

मूल तालुक्यातील बेंबाळ ग्राम पंचायतीत लाखोचा घोटाळा झाल्यांचा आरोप असून, सरपंचा वैजयंती मारगोनवार या दोशी असल्याचा अहवाल जिल्हा परिशदेने विभागीय आयुक्त नागपूर यांचेकडे पाठविला आहे.  या प्रकरणात सरपंच सौ. वैजयंती अरूण मारगोनवार हे दोशी असल्यांचे दिसून येत असल्यामुळे महाराश्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1958 चे कलम 39(1) नुसार कार्यवाहीस चैकषी करण्यांची पूर्वपरवानगी द्यावी अषी विनंती जिल्हा परिशदेच्या मुख्य कार्यपालन    अधिकारीने दिनांक 3/11/2014 चे प्रस्तावानुसार केली असून, राजकीय दबावात हा प्रस्ताव थंडबस्त्यात ठेवण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.
बेंबाळ ग्राम पंचायतीचे सदस्य दिवाकर कवडूजी कडस्कर यांनी या प्रकरणाची लेखी तक्रार जिल्हा परिशदेला केली होती.  या तक्रारीची प्राथमिक चैकषी केल्यानंतर गंभीर स्वरूपाची तक्रार असल्यांची नोंद करून, कारवाई करण्याची परवानगी मागणारा प्रस्ताव जिल्हा परिशदेने विभागीय आयुक्ताला पाठविला आहे.
पंचायत समिती मूल येथील चैकषी अधिकारी तथा विस्तार अधिकारी जे. के. राऊत यांनी चैकषी करून तत्कालीन संवर्ग विस्तार अधिकारी बि.टी. मापारी यांचे सहीनिषी जिल्हा परीशद चंद्रपूर यांचेकडे 22 फरवरी 2014 ला अहवाल सादर केला आहे. यात दुकान गाळे         बांधकामाचे प्रमाणक नसताना रूपये 1,93682 खर्च केले आहे, अंगणवाडी       बांधकामातील षिल्लक 48352 रूपये अफरातफर केली आहे, पर्यावरण संतुलीत ग्राम समृध्दी योजनेतील रपटा बांधकामावर अंदाजपत्रकाषिवाय 209770 रूपये खर्च केले आहे, सौर दिवे खरेदीत कोणतीही निविदा न मागविता 168300 रूपये खर्च केले आहे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डिप बरीयल पीट बांधकामातील रक्कम 89550 रूपये कोणतेही काम न करता खर्च दाखविले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वार्ड रूम बांधकामाची रक्कम 323992 रूपये बांधकाम न करता खर्च केल्याचे दाखविले आहे. एकुण 12 लक्ष 46 हजार 307 रूपयाचे आर्थीक गैरव्यवहारात सरपंच वैजयतीमाला मारगोनवार व सचिव के.एम. मेश्राम यांचेकडुन समप्रमाणात वसुल करण्याचा प्रस्ताव असुन महाराश्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39(1) नुसार कार्यवाही करण्यासाठी परवानगीकरीता जिल्हा परीशदेने नागपूर आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला आहे. मात्र सत्तेच्या जोरावर हे प्रकरण दाबुन ठेवल्याची चर्चा गावात आहे.
षासनाने या प्रकरणात तातडीने कारवाई न केल्यास कोर्टातून दाद मागण्याची तयारीही गावकÚयांनी केली आहे..