श्रीहरी अणे यांचेवरील शाही हल्ल्याचा श्रमिक एल्गार तर्फे निषेध

स्वतंत्र विदर्भासाठी दिल्ली येथील जंतर मंतरवर आंदोलनाला संबोधीत करीत असतांना राज्याचे महाधिवक्ता जेष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांचेवर समाजकंटकानी शाईफेक करून, विदर्भाचे आंदोलनाचा अपमान केला.  या घटनेचा आम्ही निषेध करतो.
स्वतंत्र विदर्भ झाला पाहिजे ही विदर्भाची जनभावना आहे. त्यामुळेच दिल्ली येथील आंदोलनाला विदर्भातील जनतेनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.  यामुळे विदर्भाचे शोषणावर जगणारे खवळले असून, त्यातूनच हे भ्याड कृत्य केले आहे.
विदर्भासाठी चालू असलेल्या जंतर—मंतर येथील आंदोलनात श्रमिक एल्गारचे महासचिव विजय कोरेवार यांचे नेतृत्वात 10 कार्यकर्ते सहभागी झाले असून, या आंदोलनाचे पाठीशी श्रमिक एल्गार पूर्णपणे सोबत आहे.
अॅड. पारोमिता गोस्वामी,
अध्यक्ष श्रमिक एल्गार