चंद्रपूर जिल्ह्यात ‘महिला दारूबंदी जनसुनवाई’ दारूबंदीचे उल्लेखनीय कार्य करणा—यास ‘क्रांती कन्या सन्मान पुरस्कार’

चंद्रपूर जिल्ह्यात ‘महिला दारूबंदी जनसुनवाई’
दारूबंदीचे उल्लेखनीय कार्य करणा—यास ‘क्रांती कन्या सन्मान पुरस्कार’
दारूबंदीचे वर्षपूर्ती निमीत्त वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चंद्रपूर जिल्हा दारूमुक्ती अभियानचा उपक्रम
चंद्रपूर जिल्हा दारूबंदीच्या अमंलबजावणीच्या एक वर्षपूर्ती निमित्त जिल्ह्यात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी चंद्रपूर जिल्हा दारूमुक्ती अभियानच्या वतीने ‘महिला दारूबंदी जनसुनवाई’  घेण्यात येणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीसाठी महिलांनी केलेल्या प्रदिर्घ आंदोलनाला 1 एप्रिल 2015 रोजी दारूबंदीच्या अमंलबजावणीने यश मिळाले.  मागील एक वर्षात जिल्ह्यात दारूबंदीमुळे काही सकारात्मक बदल झाले तर, अवैद्य दारूच्या पुरवठा सुरू झाल्यांने अमंलबजावणीतील उणीवा स्पष्ट झाल्या आहेत.
महिला दारूबंदी जनसुनवाईसाठी मान्यवरांचे पॅनल तयार करण्यात आले असून, महिलांना दारूबंदीचे अनुभव आणि अपेक्षा मांडण्याची संधी या जनसुनवाईत मिळणार आहे.
या जनसुनवाईत महिलांनी सांगीतलेले अनुभव व अपेक्षांचे एकत्रीकरण करून, चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीची अमंलबजावणी अधिक परिणामकारक करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला व राज्य शासनाला अहवाल देण्यात येईल.
मागील एक वर्षात ज्या महिला किंवा महिला बचत गटांनी दारूबंदीसाठी उल्लेखनीय कार्य केले, अशा महिला, महिला पदाधिकारी अथवा महिला बचत गटाला ‘क्रांती कन्या सन्मान’ पुरस्कार देण्यात येणार आहे. 5 हजार रूपये रोख, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.  प्रत्येक उपविभागातील चार ‘क्रांती कन्या’ चा या पुरस्कारांने गौरव केला जाणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय स्तरावर जनसुनवाई घेण्यात येणार असून, ती दोन टप्यात घेण्यात येईल.  पहिल्या टप्यात गडचांदूर, सावली, नागभीड, चंद्रपूर, बल्हारपूर, चिमूर येथील जनसुनवाई घेण्यात येणार आहे, उर्वरित उपविभागातील जनसुनवाई दुस—या टप्यात घेण्यात येईल.
दिनांक 10 एप्रिल रोजी राजूरा उपविभागाची जनसुनवाई गडचांदूर येथे रेणुका सभागृह, येथे दुपारी 12 वाजता घेण्यात येणार असून, त्यात जेष्ठ सामाजीक कार्यकत्र्या डाॅ. रजनी हजारे, अभियानच्या संयोजीका अॅड. पारोमिता गोस्वामी, प्रहारचे अध्यक्ष पप्पु देशमुख, पत्रकार विकास कुंभारे यांची पॅनल तयार करण्यात आली आहे.
दिनांक 13 एप्रिल रोजी सावली येथील नाग विदर्भ चरखा संघचे आवारात होणा—या मूल, सावली तालुक्यातील महिलांना या जनसुनवाईत सहभागी होता येईल.  यासाठी सामाजीक कार्यकर्ते आबिद अली, अॅड. कविता माहोरकर, अॅड. पारोमिता गोस्वामी, पत्रकार प्रमोद उंदिरवाडे यांची पॅनल तयार करण्यात आली आहे.
दिनांक 29 एप्रिल ला चंद्रपूर, 30 एप्रिल ला चिमुर 1 मे रोजी नागभीड  7 मे रोजी बल्हारपूर येथे जनसुनवाई घेण्यात येणार आहे.  या जनसुनवाईचे पॅनल व स्थळ लवकरच जाहीर करण्यात येईल. जनसुनवाईचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुस—या टप्पा जाहीर करण्यात येईल.
महिलांनी दारूबंदीबाबत त्यांचे अनुभव व अपेक्षा मांडण्यासाठी या जनसुनवाईचा लाभ घ्यावा, मागील एक वर्शात दारूबंदीसाठी मागणी निवेदन दिले असल्यास त्याची प्रत सोबत आणावी तसेच ज्यांनी मागील एक वर्षात दारूबंदीसाठी कार्य केले अशांनी‘क्रांती कन्या सन्मान पुरस्कार’ करीता विजय सिध्दावार (9422910167, 7588883477) किंवा विजय कोरेवार (7588549057, 9764168474) यांचशी संपर्क    साधावा असे आवाहन अभियानच्या संयोजीका अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केले आहे.