मूल नगर परिषदेत ‘धाराबंदी घोटाळा’

मूल नगर परिषदेत ‘धाराबंदी घोटाळा’
कंत्राटदार करतोय चारपट वसूली - नपचे कानावर हात
मूल - षहरातील गुजरी बाजार व आठवडी बाजारातील भाजी विक्रेत्यांकडुन निर्धारीत केलेल्या दरापेक्षा दहापट वसूली केल्या जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून हा गैरव्यवहार थांबवावा अषी मागणी जोर धरत आहे. 
श्रमिक एल्गारचे युवा कार्यकर्ते दिनेष घाटे यांनी माहीतीच्या अधिकाराखाली मागीतलेल्या माहीतीवरून मूल नगर परीशदेत      ‘धारेबंदी घोटाळा’ उघडकिस आला आहे. नगर परिशदेचे मुख्याधिकारी, अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या जाणिवपूर्वक दुर्लक्षतेमुळे संबंधीत कंत्राटदारांनी गरीब व किरकोळ भाजी विक्रेत्यांकडुन लुटमार चालविली आहे.
मूल येथील गुजरी बाजार आणि आठवडी बाजारात बसुन भाजी व इतर दैनंदिन आवष्यक वस्तु विकणाÚयाकडुन नगर परिशद व्यवसाय कराची आकारणी केली जाते. हा कर वसुल करण्यासाठी ग्राम पंचायतीच्या काळापासुन कंत्राटदाराची नेमणुक केली जाते. कंत्राटदारांनी कोणत्या विक्रेत्याकडुन किती आकारणी करावी याबाबत स्पश्टता करण्यासाठी नगर परिशदेचे दरपत्रक आहे. याला ‘धारेबंदी’ म्हटले जाते. कंत्राटदारांनी कत्राटदारांचे कंत्राट या धारेबंदी नुसार ठरते व याच दरानुसार वसुली करायला पाहीजे. मात्र गुजरी आणि बाजारात बसलेले गरीब व अषिक्षीत विक्रेत्यांना धारेबंदीची कल्पना नसल्याने कंत्राटदारांनी नेमून दिलेले माणसे तब्बल दहापट रक्कम वसुल करून नवाच ‘धारेबंदी घोटाळा’ करीत आहे.  
धारेबंदीनियमानुसार भाजीपालावाले, भांडयाचे दुकान, कपडे दुकान, बांबुचे साहित्य, अन्न धान्य, हाॅटेल- हलवाई दुकान ,मातीचे मडके, बांगडीचे दुकान, चप्पल दुकान, मसाला दुकान अन्य दुकाने यांनी विकला जाणारा माल गाडीने आणल्यास, बैलबंडीने, सायकलने वा कावडीने आणल्यास प्रत्येकासाठी वेगवेगळे दर ठरवले आहेत. परंतु ठेकेदार मात्र आपल्याच मनमानीने 20 ते 100 रूपयांपर्यंत दर घेऊन बाजारात येणाÚया गोरगरीब षेतकरी, दुकानदार यांची फसवणुक करीत आहे. अनेक भाजी विक्रंेते, दुकानदारांना तर  केव्हा-केव्हा पावतीच दिल्या जात नसल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले.  
‘‘मी वैयक्तीक कामानिमीत्त बाहेरगावी आहे,नियमापेक्षा      अधिकची वसुली करता येत नाही कंत्राटदार   अधिकची वसूली करीत असल्यास गंभीर बाब आहे, मी परत आल्यानंतर प्रकरणाची माहीती घेवून अधिक सांगू षकेल’’
- रिना थेरकर,
नगराध्यक्षा
‘‘बाजारातील विक्रेत्यांकडून कंत्राटदार  अधिकची रक्कम वसूली करीत असल्याची तक्रार यापूर्वीही प्राप्त झाली आहे. संबधीत  कंत्राटदारास नियमानुसारच कर वसुलीची ताकीद देण्यात आली आहे. परत या प्रकरणाची चैकषी करून माहीती देवू’’
- रविंद्र ढोके,
मुख्याधिकारी