चंद्रपूर जिल्हा दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालकमंत्रींसोबत बैठक

चंद्रपूर जिल्हा दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालकमंत्रींसोबत बैठक
चंद्रपूर - जिल्ह्याचे दारूबंदीला 1 वर्श पुर्ण होत असल्याचे पाष्र्वभुमीवर राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे  पालकमंत्री नाम. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेसोबत दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणीबाबत अॅड. पारोमिता गोस्वामीसह दारूबंदी समर्थकांचे षिश्टमंडळांनी चर्चा केली.
चंद्रपूर जिल्ह्यात 1 एप्रिलपासुन दारूबंदी करण्यात आली. दारूबंदीला 1 वर्श पुर्ण होत आहे.  दारूबंदीबाबत काही दिवसापूर्वी दारूबंदी समर्थकांची बैठक चंद्रपूर येथे घेण्यात आली होती व या बैठकीत  पुढील कालावधीत प्रभावी अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात येऊन पालकमंत्री नाम. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेसोबत चर्चा करण्याचे ठरले होते. त्यानुसार दिनांक 25 मार्च रोजी षासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे नाम. मुनगंटीवार व दारूबंदी समर्थक यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी यांना दारूबंदीसाठी नोडल अधिकारी म्हणुन जबाबदारी देण्यात यावी, कायद्यात बदल करण्यात यावे, चंद्रपूर येथे फाॅरेंसिक लॅब देण्यात यावे, पोलीस पथक देण्यात  यावे, जादा पोलीस वाहन देण्यात यावे, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा ही तिनही जिल्ह्यांना दारूमुक्त झोन म्हणुन व्यसनमुक्ती निधी देण्यात यावा, दारूमुक्ती झोनपासुन 25 किमी अंतरावर नविन दारूची दुकाने देण्यात येऊ नये,  अषी मागणी मंत्री महोदयाकंडे निवेदनाव्दारे करण्यात आली. यावेळी चंद्रपूर येथे जिल्हा नियोजनातुन फाॅरेंसिक लॅबकरीता ताबडतोब मंजूरी देण्याचे आष्वासन दिले. कायद्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे यावेळी संागीतले. बैठकीत जिल्हा पोलीस अधिक्षक संदिप दिवान यांना दारूविक्रेत्यांना पाठीषी न घालता ठोस कारवाई करण्याचे निर्देष दिले. उत्पादन षुल्क अधिक्षक यांनाही दुरध्वनीवरून दारूबंदीचे कार्यवाहीची कडक अंमलबजावणी करण्याची ताकीद दिली. दारूबंदीमुळे जिल्ह्यात झालेल्या सकारात्मक बदलाची चर्चाही यावेळी झाली.
यावेळी षिश्टमंडळात अॅड. पारोमिता गोस्वामी, डाॅ. रजनी हजारे, श्रीमती नंदा अल्लुरवार, आलोक धोटेकर  नम्रता ठेमस्कर,  आबिद अली, आलोक धोटेकर, चरणदास नगराळे, विजय सिध्दावार, अमित आसेकर, ईष्वर बट्टे, घनष्याम मेश्राम, अमित राऊत, आदीसह अनेक दारूबंदी समर्थक हाजर होते.