वेंडर ऐक्ट: बल्हारपूर येथे आज श्रमिक एल्गार ची सभा.

महानगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायत येथील किरकोळ विक्रेतांसाठी केंद्र सरकारने पारित केलेला वेंडर एेक्ट लागू करावे यासाठी बल्हारपूर येथे फुटपाथ व्यावसायिकांची सभा घेण्यात येणार आहे.  
आज दुपारी ३ वाजता ही सभा घेण्यात येणार आहे.
ही सभा बचत भवन, नगर परिषद चे मागे येथे होणार आहे. या सभेला श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा पारोमिता गोस्वामी, उपाध्यक्ष विजय सिध्दावार, महासचिव विजय कोरेवार उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.
ससभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन फरजाना शेख यांनी आवाहन केले आहे.