फसवणूकीचा आरोपी झाला पोलिस पाटील
420 सह अनेक आरोपात आरोपी असलेल्या व्यक्तीस राजूराचे उपविभागीय दंडाधिकारी यांनी भेंडवीच्या पोलिस पाटील पदावर नियमबाहय नेमणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संतोष सलाम या व्यक्तीची नियुक्ती पोलिस पाटील म्हणून केली, त्याचेवर राजूरा पोलिस स्टेशनमध्ये विविध गुन्हे दाखल आहे.
राजूरा तालुक्यातील संवेदनशील गाव म्हणून भेंडवीची ओळख आहे. या गावात नविन पोलिस पाटीलांची निवड प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात अनेकांनी अर्ज केले. यात संतोष सलाम यांचाही समावेश होता.
संतोष सलाम यांचेवर पोलिसांत विविध गुन्हे दाखल आहेत, ग्राम पंचायतीच्या माध्यमातून तो भ्रष्टाचार करीत असून, बनावट जातीची नोंद करून मुलांना शिष्यवृत्ती मिळवित आहे अशी तक्रार गावक—यांनी केली आहे.
संतोष सलाम यांचे विरोधात राजूरा पोलिस स्टेशनमध्ये अनेक तक्रारी दाखल झाले. यातील अप. क्रं. 184/12 अन्वये 420, 468, 471, 200 अन्वये गुन्हा दाखल झाला असून, 29/4/2013 रोजी कोर्टात दोषारोपपत्रही दाखल केले आहे. सध्या ही केस कोर्टात सुरू आहे. पोलिस पाटीलांची निवड करतांना, पोलिसांकडून चारित्राचे प्रमाणपत्र घेतले जाते, कोणत्याही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीची पोलिस पाटील पदावर निवड करता येत नाही, असे असतांनाही उपविभागीय दंडाधिकारी यांनी एका आरोपीला पोलिस पाटील कसे नेमले याबद्दल आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.