५५ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

नागपूर- राज्य शासनाने दिवाळीच्या पूर्वसंध्येला राज्यातील ५५ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या असून त्यात नागपुरातील पोलिस निरीक्षक नामदेव रिठ्ठे, संजय सांगळे, बाबुसिंग राठोड, नागपूर ग्रामीणचे अजयकुमार मालवीय यांचा समावेश आहे.