जटपुरा गेटवरील वाहतूक कोंडी

चंद्रपूर : जटपुरा गेटवरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढकार घेत शनिवारी चक्क गेट परिसरातच नागरिक आणि अधिकार्‍यांची स्टँडिंग मिटिंग घेतली. या बैठकीत नागरिकांचे प्रस्ताव ऐकून घेत जिल्हाधिकार्‍यांच्या नेतृत्वात शहर वाहतूक समिती गठित करण्याची घोषणा केली. एवढेच नाही तर नागरिकांनी सुचविलेल्या आराखड्यानुसार पहाणी करून तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचनाही अधिकार्‍यांना दिल्या.