कौशल्य विकास क्षेत्रात ममता ओगुलवार हिची देशात बाजी - CITS परीक्षेत महिला गटातून ऑल इंडिया टॉपर

 कौशल्य विकास क्षेत्रात ममता ओगुलवार हिची देशात बाजी - CITS परीक्षेत महिला गटातून ऑल इंडिया टॉपर

मूल : कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत कु. ममता परशुराम ओगुलवार हिने CITS (Craft Instructor Training Scheme) परीक्षेत महिला गटातून ऑल इंडिया टॉपर होण्याचा मान पटकावला आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

    नुकतेच राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था (NSTI), हावडा, कोलकाता येथे आयोजित कौशल दीक्षांत समारोह 2026 मध्ये दिनांक 21 नोव्हेंबर 2026 रोजी ममता ओगुलवार यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. भारत सरकारच्या कौशल्य भारत (Skill India) अभियानांतर्गत व्यावसायिक प्रशिक्षण क्षेत्रात प्रशिक्षक घडविण्यासाठी CITS प्रशिक्षण महत्त्वपूर्ण मानले जाते. या प्रशिक्षणक्रमात महिला गटातून देशात प्रथम क्रमांक मिळवणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.

     वडील परशुराम ओगुरवार हे मूळचे मूल तालुक्यातील बेंबाळ गावचे असून कामानिमित्त चंद्रपूर येथे स्थायिक झाले आहेत. ममता ओगुलवार यांनी आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि चिकाटीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे. ही भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयांतर्गत चालणारी योजना आहे. ITI मध्ये प्रशिक्षण देणारे व्यावसायिक प्रशिक्षक पदासाठी तिला वाव आहे. तिच्या या यशामुळे विद्यार्थिनींसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.

त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!