सोनम सीडस् कंपनीच्या निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान - कृषिमंत्र्यांकडे आ. विजय वडेट्टीवार यांची तक्रार
सोनम सीडस् कंपनीच्या निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान - कृषिमंत्र्यांकडे आ. विजय वडेट्टीवार यांची तक्रार
सावली : सावली तालुक्यातील खेडी परिसरातील शेतकऱ्यांची सोनम सीडस् कंपनीच्या 'महाराजा' भात बियाण्यामुळे फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
खेडी येथील आठ शेतकऱ्यांनी याबाबत कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी शेतावर जाऊन पाहणी व पंचनामा केला. मात्र, पंचनामा होऊनही अद्याप शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक भरपाई मिळालेली नाही किंवा संबंधित दोषी कंपनीवर ठोस कारवाई झालेली नाही. या प्रकरणाची माहिती पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार यांनी महाराष्ट्र विधामंडळाचे गटनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांचेकडे दिली. याची दखल घेत आमदार वडेट्टीवार यांनी कृषिमंत्र्यांना पत्र देऊन या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, बियाण्यांच्या गुणवत्तेची तपासणी करावी, शेतकऱ्यांच्या झालेल्या पीक नुकसानीचे निष्पक्ष मूल्यांकन करावे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य आर्थिक भरपाई मंजूर करावी, अशी मागणी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!