प्रणाली प्रभुदास तेलमोरे हिची आरोग्य विभागात नर्सिंग ऑफिसर म्हणून निवड
नियुक्तीने चिनोरा गावात आनंदाचे वातावरण
आमदार करण देवतळे यांच्या हस्ते प्रणालीचा सत्कार
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - चिनोरा येथील प्रणाली प्रभुदास तेलमोरे हिने महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील बीएससी नर्सिंग आधारित नर्सिंग ऑफिसर पुर्व परीक्षा व अंतिम परीक्षा उत्तीर्ण केली असून तीची निवड झाली आहे. प्रणाली तेलमोरे हिने मुंबई येथील बॉम्बे नर्सिंग हॉस्पिटल मुंबई येथे बीएससी नर्सिंग चे शिक्षण पूर्ण केले असून नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील स्टाप नर्स व नर्सिंग ऑफिसर च्या झालेल्या परीक्षेमध्ये भाग घेतला व नर्सिंग ऑफिसर पदाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे चिनोरा परिसरातील वार्डामध्ये आनंदाचे वातावरण आहे, आई सुशीला प्रभुदास तेलमोरे ह्या चिनोरा ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच आहे त्या सामाजिक कार्यात सहभागी होत असतात.प्रणाली चे वडील ह्यात नाही, त्यामुळे आईचे मोलाचे मार्गदर्शन मला लाभल्याने मी यश गाठल्याचे प्रणाली चे म्हणने आहे. वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार करण देवतळे यांच्या हस्ते कुमारी प्रणाली प्रभुदास तेलमोरे हिचा काल दिनांक 17आक्टोंबर ला एका कार्यक्रमात प्रणालीचा आ. करण देवतळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.यावेळी धर्मेंद्र शेरकुरे, ग्रामीण भाजपाचे तालुका उपाध्यक्ष तथा महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष दिवाकर नन्नावरे, ग्रामपंचायत सदस्य निलेश डोंगरकर, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष प्रकाश झाडे, सुशीला तेलमोरे,याची उपस्थिती होती.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!